दोन महापुरुषांच्या वारसांची एक ऐतिहासिक भेट: दोघांचे वैचारिक एकत्र येण्याची काळाची गरज!.
सध्या मराठा आरक्षणाचा मुदा भलताच उग्र झाला आहे त्यात शाहू महाराजाचे वंशज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि जेष्ठ कायदेपंडित वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ह्या विषयावर पुणे येथे ऍड आंबेडकर यांच्या निवासस्थानी घेतली ऐतिहासिक भेट!
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने खा.संभाजीराजे भोसले हे राज्यातील विविध लोकांना भेटत आहेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ह्या विषयावर त्यांनी भेट घेतली . ही भेट असली तरी या भेटीला ऐतिहासिक संदर्भ असल्याने ही भेट ऐतिहासिक म्हणून नोंदली जाईल.
गरीब मराठ्यासाठी खा संभाजी राजे आता जीवाची पर्वा नकारता मैदानात सरळसरळ उभे असल्याने त्यांनी यासंदर्भात घेतलेली भूमिका ही बहुजन मराठा वर्गाच्या न्यायिक हक्कासाठी आहे त्यास ऍड आंबेडकर यांनी आपले सहकार्य आणि साथ असेल असे जाहीर करून आपल्या आजोबांच्या कार्याचा महान वारसा जपला असून दोन्ही ही समाजातील जो संघर्ष आहे त्यास कमी होण्यास मदत होऊन एक सामाजिक समीकरण निर्माण होईल यात शंका नाही.
या संदर्भातील दोन्हि नेत्यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडून पुढील राजकीय संकेत काय असतील ह्याची तालीम दाखवून दिली.ह्यावेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी खलील उत्तर देताना ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आरक्षण हे अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल होत आहे, पण इथला राज्यकर्ते ते मानायला तयार नाही. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायकच होईल असं नव्हे तर काहीवेळा राज्यसत्ता चालवायला अडचण येईल.
“आरक्षणासाठी राज्यकर्त्यांची इच्छा हवी होती. रिव्ह्यू पिटीशन नाही तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत हे करायला हवं. राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून पुनर्विचार याचिका करू शकतो. राज्यसत्तेशिवाय हे होणं अशक्य आहे.”
शरद पवारांचं राजकारण : नरो-वा कुंजरो वा –“शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार -ऍड प्रकाश आंबेडकर
ते पुढे म्हणाले, “शरद पवारांचं राजकारण 40 वर्षं बघतोय, ते नरो-वा कुंजरो वा असं करतात. पण, सगळ्याच विषयात असं करून चालत नाही. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. आपण अपेक्षा करूया ते काहीतरी भूमिका घेतील.”शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय,” असंही ते पुढे म्हणाले.
खा.छत्रपती संभाजी राजे व ऍड प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट..!
या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “गायकवाड समितीचा अहवाल त्रुटी भरून काढून लागाव्या लागतील, परिस्थिती प्रतिकूल, प्रयत्न करू. लवकरात लवकर दिल्लीत गोलमोज परिषद घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सगळे खासदार यांना बोलावणार”