मानवी हक्काचा सेनापती ते संविधान रक्षक.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
महेश भारतीय-भाष्य प्रकाशन मुंबई
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
नुकतेच न्यायमूर्ती सुरेश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मानवी हक्क आणि संविधान संरक्षण न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता ते त्या विचारधारेला धरून आपल्या कारकिर्दीत कार्य करत राहिले मुंबईतील प्रतियश भाष्य प्रकाशन चे प्रकाशक आणि सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे नेते मा महेश भारत यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली.
-जस्टीस सुरेश यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन—— सुरेश यांचा जन्म, होस्बेट अथवा हॉस्बेटू सूरथकल, कर्नाटकात 20 जुलै 1929 मध्ये झाला. मंगलोर युनिव्हर्सिटीतून BA झाल्यावर, मुंबई विद्यापीठातून MA झाल्यावर, 30 नोव्हेंबर 1953 आला मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस केली. 1960 ते 1965 गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट येथे ते पार्टटाईम लेक्चरर होते. नंतर 1965 ते 1968 पर्यंत के सी कॉलेजमध्ये लेक्चर होते.
सुरेश यांनी सरकारी वकील म्हणून वर्षभर काम केल्यानंतर 21 नोव्हेंबर 1968 ला ते मुंबईच्या सिविल आणि सेशन कोर्टात ॲडिशनल, आणि 1979 ला प्रिन्सिपल ॲडिशनल जज होते. कायदा विभागातील करप्ट प्रॅक्टिसेस च्या विरोधात त्यांनी 23 जून 1980 ला प्रिन्सिपल सेशन जज या पदाचा राजीनामा दिला. मग पुन्हा प्रॅक्टिस सुरू केले. बॉम्बे हायकोर्ट ने त्यांना 1982 ला वरिष्ठ वकील या प्रवर्गातून हायकोर्ट जज म्हणून नियुक्ती झाली. 21 नोव्हेंबरला, 1986 ला ते मुंबई हाय कोर्टात ॲडिशनल जज म्हणून त्यांनी काम सुरू केलं. 12 जून 1987 ला परमनंट जज म्हणून त्यांची मुंबई हायकोर्टात नियुक्ती झाली.
19 जुलै 1991 ते निवृत्त झाले. तेव्हापासून ते सतत मानवी अधिकारांचे संरक्षक, भारतीय राज्यघटनेचे संरक्षक योद्धा म्हणून संपूर्ण देशाला परिचित होते. जस्टीस कृष्ण अय्यर, जस्टीस पी बी सावंत, जस्टिस हेमंत गोखले, जस्टीस सिराज दाऊद, जस्टिस राजिंदर सच्चर यांच्याशी ते नियमित संबंध ठेवून होते.कावेरी (कर्नाटक) दंगलीच्या चौकशी कमिटीवर जस्टीस टीवाटीया यांच्यासोबत जस्टिस सुरेश यांची नेमणूक झाली होती. ह्यूमन राइट्स कमिशन वर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईच्या 1992 ला (डिसेंबर) दंगलीचा रिपोर्ट “people’s verdict” या नावाने प्रसिद्ध आहे. त्यासाठी त्यांनी खूप काम केलं होतं. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित समूहाला कायमचं घरकुल मिळण्यासाठी जस्टीस सुरेश यांनी खूप काम केलं. 1995 ला झालेल्या झोपडपट्टी वरील रिपोर्ट ने सरकारची पोलखोल झाली. आणि सरकारला झोपडपट्टीतील लोकांसाठी अनेक योजना आणाव्या लागल्या. बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातील अतिक्रमित जमिनी वरील बाधित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप काम केलं. गुजरात दंगली वरील त्यांचा 2002 मधला रिपोर्ट (क्राईम against humanity रिपोर्ट) ने गुजरात सरकारची पोलखोल केली. 2094 लोकांच्या तोंडी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. जस्टीस बी सावंत, जस्टीस कृष्ण अय्यर यांच्या इंडियन people’s tribunal ने (IPT) रिपोर्ट तयार केला होता. त्यात जस्टीस सुरेश होते. हा रिपोर्ट स्फोटक झाला होता. तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री हरेन पंड्या ने कबुली दिली की गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना दंगे रोखण्यासाठी पावले उचलण्यास मनाई केली होती. पुढे जाऊन हरेन पंड्या यांची 2003 मार्च मध्ये हत्या करण्यात आली.रेशनवरील धान्य गरजूंना मिळावे म्हणून जी इंडियन पीपल्स tribunal ने कमिटी केली होती त्याचे ते प्रमुख होते. 2010 मध्ये हा रिपोर्ट आल्यावर सरकारला खाडकन जाग आली. रेशनिंग मधील भ्रष्टाचार कमी होण्यास या रिपोर्ट ची मदत झाली. काश्मीर खोऱ्यातील पोलिसी अत्याचाराचा चौकशीसाठी जी कमिटी बनली होती त्यातही सुरेश होते. या कमिटी चा रिपोर्ट 8 सप्टेंबर 2010 मध्ये प्रसिद्ध झाला. The armed फॉर्सेस (स्पेशल पॉवर) 1958 मधील त्रुटी त्यांनी जगासमोर आणल्या. आणि मानवी हक्कांचे कसे उल्लंघन पोलीस आणि भारतीय सैन्याकडून झाले, याचा सविस्तर रिपोर्ट आणि मुलाखती यात दिल्या होत्या.निवडणुकीतील करप्ट प्रॅक्टिस च्या विरोधात त्यांनी लँडमार्क जजमेंट दिल. मुंबईची पार्ले विधानसभेची पोटनिवडणूक, शिवसेनेने हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर लढवली होती. मुंबईचे महापौर रमेश प्रभू यांना या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली होती. प्रभू निवडणूक जिंकले पण आणि हरलेही. मुंबई हायकोर्टाचे सुरेश यांनी ही निवडणूक रद्दबातल ठरवली कारण हिंदुत्ववादाचा धार्मिक प्रचार करून, ही निवडणूक जिंकली होती. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल योग्य ठरवला. 1995 ते 2000 एक ही पाच वर्ष सुप्रीम कोर्टाने सुरेश प्रभू यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्याचा निकाल दिला होता. जस्टीस सुरेश हे खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचे संरक्षण होते. बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जस्टीस सुरेश यांच्यावर टीका केली होती. सुरेश यांच्या अंधेरी येथील घरावर 2008 मध्ये हल्ला करण्यात आला होता. त्यांनी 33 sitting judges वर कोर्टाच्या फंडाचा अपहार केल्याचा आरोप केला होता. जस्टीस सुरेश अशा सोसायटीत राहत होते, कि ती सोसायटी रिटायर हायकोर्ट जजेस ची होती. तरीही त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.खैरलांजी हत्याकांड, रमाबाई हत्याकांड या सर्वांमध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. मी माझ्या भाष्य प्रकाशनाच्या वतीने त्यांची पुस्तके छापली होती. प्रकाशनाला जस्टीस हेमंत गोखले, एडवोकेट प्रकाश आंबेडकर, एडवोकेट सुझन आले होते. गेली तीस वर्ष त्यांच्याशी संपर्क होता. मृदुभाषी असलेले सुरेश सहजा कुणाला दुखवत नसत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्य अधिवेशनाला 21, 22 डिसेंबर 2018 रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे ते हजर होते. सम्यक च्या विद्यार्थ्यांना त्यांनी मौलिक असं मार्गदर्शन केलं होतं. आज पहाटे त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मानवी हक्कांच्या लढ्याचा खंदा समर्थक हरपला. त्यांना विनम्र अभिवादन..!!
(सभार : महेश भारतीय यांच्या FB वॉल वरून सभार.)