#CAB विरुद्धचा बुलंद आवाज…….!

#CAB विरुद्धचा बुलंद आवाज, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरचाजीवघेणा हल्ला आणि तो बघत असलेले आपण सगळे……!.

एकेकाळच्या काँग्रेसी नेत्या आणि आताच्या,
भाजपच्या जेष्ठ #मुस्लिमनेत्या #नजमाहेब्दुल्ला ह्या
Jamia Millia Islamia, दिल्ली स्थित विद्यापीठाच्या कुलपती (Chancellor) आहेत.

एक मुस्लिम महिला जीचा 44 वर्षांचा राजकीय प्रवास (1960 ते 2004 पर्यंत )काँग्रेस पक्षापासून सुरू होतो मग त्या भाजपमध्ये 2004 ला जातात भाजपकडून त्यांना, 2016 मध्ये मणिपूरच राज्यपाल पद दिलं जात,
ज्यांच्या नावे 4 मोठ्या पुस्तकांची यादी आहे.

ज्या महिलेने 59 वर्षांचा राजकीय प्रवास केलाय,
अश्या धर्माने मुस्लिम असलेल्या महिलेच्या विद्यापीठात जर मुलींचा लाईट बंद करून विनयभंग केला जात असेल, त्यांच्या मुलांना, मुलींना जर कुत्र्या डुकरांसारख मारलं जात असेल, आणि इतकं होऊनही ही मुसलमान बाई गप्प बसत असेल तर गंभीर आहे.
हे गंभीर केवळ यासाठी आहे की या नजमा मातेला एकही मुलगा नसून तिन्ही मुलीच आहेत अश्या मुलींच्या आईला आपल्या विद्यापीठातील मुलींबद्दल काहीही वाटत नाही याबद्दल काय बोलावं ????

याहून गंभीर आहे की,
दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांना आताच्या युथ ने खूप डोक्यावर घेतलंय असा केजरीवाल भले ज्याच्या हातात दिल्ली पोलिसांचा कंट्रोल नसेलही, त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून हे सगळं रोखलं असत तर

दुसरं की आमचे तथाकथित आंबेडकरवादी नेते आणि संघटना, ज्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो आमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या #बामसेफ या संघटनेचा ह्यांचा यात आतून काम सुरू आहे की बाहेरून ते लवकरच सनसनाटी खबर बनून बाहेर येईलच,

त्यानंतर नंबर येतो आमच्या बेहनजी अर्थात एकेकाळच्या अतिशय डेंजर अश्या वैचारिक आणि कृतिशील डॉन असलेल्या मायावतीजी,
त्यांनी किमान त्यांचे दिल्लीतील कार्यकर्ते, वकील यांना आदेश दिले पाहिजेत जेणेकरून काही गोष्टी रोखता येऊ शकतील.

शेवटचे पण आता सध्या सगळ्याच राज्याच आद्यस्थान, आशास्थान असलेले श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या कडून देखील अपेक्षा आहेतच पण मागच्या वेळी #JNU पेटलं तेंव्हा ह्यांनी तो Stake घ्यायला हवा होता पण घेतला नाही आताही वेळ गेली नाहीये,
एका बाजूला मुस्लिम, आसाम मणिपूर आणि इतर भाग जळत असताना एका आंबेडकरवाद्याने सगळ्यांना साथ सहयोग देणे ही काळाची गरज आहे.

ज्या मूस्लीम पोरा पोरींना आज समतावादी आंबेडकर कळतोय, आंबेडकरांचा फोटो आंदोलनात मध्यभागी आणण्याच कळतंय त्या सगळ्यांना आंबेडकरवाद आजवर रुजवणाऱ्या सगळ्याच आंबेडकरवादी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हाथ देणं गरजेचं आहे कारण उद्या हीच लिडरशीप परत एकदा हिंदी भाषेतून हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बोंबलण्यापेक्षा, आणि सावरकर की गांधी हा वाद घालण्यापेक्षा आंबेडकर विरुद्ध Rss आणि आंबेडकरवादी समता विरुद्ध Rss ची विषमता यासाठी वैचारिक दृष्टया तयार व्हावी याचसाठी तिथे गेलं पाहिजे.

बाकी पोर मेल्याच दुःख कायम राहील पण विषमतेचा काळ सोकावयाला नकोच.

टीप :
बाकी आपण सगळेच सज्ञान आहोतच की.

महेंद्र अशोक पंडागळे
07262999045

Next Post

NRCआणि CAB विरोधात तरुण रस्त्यावर उतरला आहे...!

सोम डिसेंबर 16 , 2019
NRCआणि CAB विरोधात तरुण रस्त्यावर उतरला आहे,…! जगातील अनेक क्रांत्या साक्षी आहेत, जेव्हा तरुणांनी मनावर घेतले तेव्हा मुजोर राजेशाही, सामंतशाही,हिटलरशाही, घालवून तरुणांनी आपल्या देशात बदल घडविला आहे…! राज्यकर्त्यांना अभिप्रेत होते की, एकाच वर्गाला टार्गेट करुन जेरीस आणू त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच […]

YOU MAY LIKE ..