भारतीय सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत क्रांतिसूर्य महामानव राष्ट्रपिता

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले-
भारतीय सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत क्रांतिसूर्य महामानव राष्ट्रपिता.

भारतीय जातीय समाजव्यवस्था आणि धार्मिक प्रमाण्यवादाच्या विरोध प्रमुख वैचारिक क्रांती करत शिक्षण, स्त्रियांना,शूद्रांना व अतिशूद्रांना मुक्तीचा मार्ग देणारे आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात.

अज्ञान हेच मागासलेल्या समाजाचे कारण आहे आणि त्यामुळेच सारा भारत वर्ष गुलामगिरीत खितपत आहे यावर ठाम असणारे महात्मा जोतिबा फुले काळाच्या ही पुढे होते .आज जी सामाजिक व्यवस्था बदलली आहे त्याचे खरे योगदान हे त्यांचेच ज्या महात्मा फुल्यांचे शिष्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक पद्धतीने हक्क मिळवून दिले आणि आपल्य आदर्श गुरुचे स्वप्न साकार केले.

असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. ही पदवी त्यांना ई. स. 1888 मध्यमिळाले शेतकऱ्यांच्या हितासाठी “शेतकऱ्यांचे आसूड” हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.
सूर्या परी सत्यप्रकाश पिरिता शांती सर्व देतो| चंद्र जैसा|तोच खरा महात्मा म्हणावा. अशा थोर महात्मा ला को ‘mटी कोटी वंदन…

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुलेजोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव:जोतीबा, महात्मा
जन्म:११ एप्रिल १८२७खानवडी, पुणे,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०पुणे, महाराष्ट्र
संघटना:सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके:
भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे धर्म:हिंदु
प्रभाव:शिवाजी महाराज,थॉमस पेन
प्रभावित:डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे वडील:गोविंदराव फुले आई:
चिमणाबाई फुले पत्नी:सावित्रीबाई फुले अपत्ये:यशवंत

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता .

बालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नवलोंकीक होता.

सामाजिक कार्य
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लिहिली

संसाराविषयी फुले यांचा दृष्टीकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणा-या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो.
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .

आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री – पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे . जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही , अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला ‘सत्यवर्तन ‘ करणारा म्हणावे .

आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री – पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे . त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही , त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह , आपल्या भाऊबंदास , आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत , त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांंचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता .त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . ‘अखंड’ या काव्यप्रकारात त्यांनी ‘मानवाचा धर्म’ , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||

न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||

धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||

सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||

दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||

विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||

स्त्री – पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ || स्वतः हितासाठी खर्च जे करती ||अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||

निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१||

सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||

होईना भूदेव जाती मारवाडी || मानवा न पीडी || सर्ववत ||३||

अशा सज्जनास मानव म्हणावे || त्यांचे गुण घ्यावे || जोती म्हणे ||४||

क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी | तो खरा बळी || मानवात ||१||

सर्वांभूती द्या हृदयी कोमल || घालितो अगळ || इंद्रियांस ||२||

जगात वर्ततो सद्गुणी मवाळ || वासनेस मूळ || डाग नाही ||३||

सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी || तोच सत्यवादी ||’जोती म्हणे ||४||

निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||

त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले || स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||

कोणास न पीडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३||

खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||

सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||

सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||

सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||

मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||

सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||”जेथे आहे ||१||

जेथे जागा धीर सदा हृदयात ||”सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||

पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||

धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||

जोतीराव शूद्रादिअतिशुद्र यांना आपल्या काव्यात यशस्वी जीवनाचा उपदेश हि करतात… ते म्हणतात,

क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे | कुटुंब पो स’ा’व’े’आ’नं’द’ान’े|| १ ||

नित्य मुली- मुलं शाळेत घालावे | अन्नदान द्यावे विध्यार्थ् य’ा’ं’स||२ ||

सार्वभोम सत्य स्वतः आचरावे |सुखे वागवावे आर्यभट्टा || ३ ||

अश्या वर्तनाने सर्वां सुख द्याल | स्वतः सुखी व्हाल जोती म्हणे || ४ ||

संदर्भ : विकिपीडिया

Next Post

काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक :

गुरू नोव्हेंबर 28 , 2019

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553

Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Tweet it Pin it Email काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक : महात्मा फुले Pin it Email https://ambedkaree.com/mahatmajotibaphule/#RkJfSU1HXzE1NzQ ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com महात्मा फुले यांचा आज स्मृती दिन। प्रत्येक महापुरुषाला काळाची मर्यादा असते हे खरेच आहे। पण त्या मर्यादेमुळे फुले हे […]

YOU MAY LIKE ..