मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्यपाल मा भगतसिंग कोशारी व इतर मान्यवर यांनी वाहिली आदरांजली !!
यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी लाखो भीमसैनिकांनी घारातूनच अभिवादन केले मात्र शासकीय ,राजकीय आणि इतर मान्यवर यांनी सरळ चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन
याच दरम्यान सोबत महाराष्ट्र राज्याचें राज्यपाल यांनी ही अभिवादन करताना माध्यमांशी बोलताना म्हटले की
यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे. सगळ्या जगात हिंदुस्थानापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि हिंदुस्थानात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे. याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
छायााचित्रे सौजन्य : दै.सामना