महापरिनिर्वाण दिन जगभरातील करोडो अनुयायांनी आपल्या उद्धारक नेत्याला केले भावपूर्ण अभिवादन केले!!!

जगाला न्याय समता बंधुता स्वातंत्र्य याचा मूलमंत्र देणारे महामानव ,भारतातील शोषित,पीडित जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले सर्वस्व बहाल करून करून न्याय आणि कायद्याची कवचकुंडले देणारा उद्धारक,प्रतिकूल परिस्थितीत आपल्या प्रचंड ज्ञान जिद्दीने ज्ञानसंपादनकरून जगातील सर्व पदव्यासंपादन करून प्रकांड पंडित म्हणून जगात पहिला मान असणारा ज्ञानसुर्य,आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण भारत देशाला संविधानाचा चौकडीत एकबद्ध करीत आधुनिक भारत निर्माता,मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीयच राहीन अशी गर्जना करीत भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारासाठी आपल्या बुद्धीच्या जोरावर समता न्याय आणि बंधुता स्थापणार व प्रत्येक भारतीयाला मताचा अधिकार बहाल करणारा सच्चा भारतीय!!.

स्त्रियांना आणि वंचितांना त्यांना न्याय व मूलभूत अधिकार मिळवून देणारा कैवारी !!! समता,स्वतन्त्र,बंधुता आणि न्याय याचा मूळ गाभा असणारा प्रज्ञा शील करुणा यांची सांगड घालत मनुष्यमात्राचा पहिला उद्धारक तथागत भगवान बुद्धाचा धम्म आपल्या लाखो अनुयायांना देत रक्ताचा एक ही थेंब ही न सांडता समाजक्रांती करीत भारतातही लाखो लोकांनाच जीवन बदलणारा युगप्रवर्तक !!!

होय अर्थातच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काल महापरिनिर्वाण दिन जगभर मोठ्या गंभीरपणे आयोजित झाला जगभरातील अनुयायांनी आपल्या उद्धारक नेत्याला भावपूर्ण अभिवादन केले!!!

या वर्षी मुबई महानगरपालिकेने व इतर TV ने चैत्यभूमी थेट LIVE दर्शन उपलब्ध करुन करोडो अनुयायांनीना दिले.दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी ला दाखल होताता मात्र यावर्षी कोरोनाचे अस्मानी संकट असल्याने व महाराष्ट्र व केंद्र सरकार यांनी केलेल्या सूचनाचे पालन करीत यावर्षी जगभरातील अनुयायांनी आपल्यालाआपल्या घरी व जीथे प्रादुर्भाव कमी आहे तिथे सार्वजनिक ठिकाणी अभिवादन केले.
मुंबईतील चैत्यभूमीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल व अन्य मंत्री खासदार यांनी जाऊन अभिवादन केले त्याच प्रमाणे सर्वमान्य आंबेडकरी नेते ऍड प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर,भीमराव आंबेडकर आणि आंनदराज आंबेडकर,केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री रामदास आठवले,जोगेंद्र कवाडे आदी मान्यवर यांनी अभिवादन केले!!

मुंबईतिल काही लोकांनी सर्व नियम पळत चैत्यभूमी हजर राहून अभिवादन केले!!!

अनावश्यक गर्दी टाळत ६४ वर्षातील हा पहिला महापरिनिर्वाण दिन प्रथमच कोरोनाच्या संकटात लाखोंच्या उपस्थितीशिवाय अनुभवता आला.


मात्र आज सर्वत्र सोशल मीडियावर आंबेडकर नावाचे वादळ धडकत होते जगभरात काल करोडो लोक केवळ महापरिनिर्वाण दिन अभिवादन आदी लिहून आपली ओळख शेअर करच होता !!!!..

यासाठी कुणीही कोणतीच #हँस टॅग की कुणीही कोणतेच आवाहन न करता हे स्वयंस्फुर्त घडत होते ..!

विविध आंबेडकरी संघटनांनी आपल्या परीने आवाहन केले होते त्यात कुणी वही,पेन पुस्तक यांचे धम्मदान करा तर कुणी पोस्टकार्ड पोस्ट करून थेट महामानवाला अभिवादन करा!!!
वरील हे ही उपक्रम यशस्वी झाले व देशातील जनतेने त्यास उत्फुर्त प्रतिसाद ही दिला!!!.देशभरात विविध संघटनानी आपापल्या जिल्हा,गाव व तालुका पातळीवर सार्वजनिक नियम पालन करीत अभिवादन केले.


बऱ्याच लोकांनी फेसबूकवर Live येऊन कुणी गाण्यातून तर कुणी कवितांतून महामानवांना अभिवादन केले. छोट्या मोठ्या युट्युब चायनल ने व fbपेज असलेल्या लोकांनी live चर्चा सत्र आयोजित करून काहींनी विविध पद्धतीने अभिवादन केले!!


यावर्षी जवळपास 3 ते 3.५ करोडो लोक प्रति सेकंद प्रमाणे जगभरात Dr.Ambedkar हा Keyword सर्च केला गेला तर Jai Bhim हा Keyword 18 लाखाच्यावर प्रति सेकंद वर सर्च केला जात आहे.

हा ही एकवेगळा भाग असून आंबेडकर हे क्रांतिकारक वादळ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्च इंजीन वर घुमत आहे !!!

विविध प्रस्तापित मेडिया,त्याचे चायनल व वेबसाईटवर आंबेडकर नावचा जयघोष करताना दिसत होत्या. मात्र सर्वसामान्य लोकनी त्यांना नाकारून सोशल मीडियावर आंबेडकर नावाचे वादळ उठले व प्रस्तापित मीडिया धक्का दिला!!!

याच वेळी तरूणाई मोठयाप्रमाणावर कार्यरत झाली ही एक
क्रांतिकारक घटना आहे !!

पुन्हा एकदा शांततेत आपल्या जीवनात लक्ष बदल करणाऱ्या आपल्या उद्धारक महामानवाला आपल्या शिस्तबद्धतेने व सरकारी नियमांचे पालन करीत अभिवादन केले त्याबद्दल www.ambedkaree.com च्या वतीने सर्वांना धन्यवाद!!!

-प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com

Next Post

व्हॉइस ऑफ फिशर्मन" अर्थात मच्छीमारांचा बुलंद आवाज!.

गुरू डिसेंबर 10 , 2020
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय दामोदर तांडेल यांचे शुक्रवार दि 4 डिसेंबर 2020 रोजी दु 12 वाजता दुःखद निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.ते मुबंई जवळच्या पालघर जिल्ह्यातले रहिवाशी होते.मात्र त्यांची कर्मभूमी कफ परेड मुबंई होती. दिवसाचे केवळ 12 तास नाही […]

YOU MAY LIKE ..