निसर्गाची देणगीच म्हणावी कोव्हिड नाईन्टीन..
याचा निर्माता मात्र होता देश चीन..
चीन भोगतोय अजून त्याचे परिणाम..
इतर देश आता लागले शोधू यावर उपाय…
भारत देशाचे मात्र उपाय म्हणजे….
थाळी वाजवा, लाईट बंद करा जसे…
थाळी वाजवल्यावर कोरोना पळणार…
लाईट बंद केल्यावर कोरोना घाबरणार..
असे मानणारे आपल्या देशाचे नागरिक…
कोण सांगणार यांना बाहेर जाणं नाही ठीक…
कळकळीची विनंती करूनही कोणी नाही ऐकलं
कडक शासन करुनही बाहेर जाणं नाही सोडलं
केली लाठीचार्ज शेवटी वैतागून…
काय होतंय काही दिवस घरात बसून..
आहे ना आता सगळीकडे लॉकडाऊन…
डॉक्टरांनाही व्हायला लागलाय
कोरोना उपचार देऊन…
काय बिघडल असत घरात बसला असता…
लॉकडाऊनमूळे आज गरीब उपाशी नसता…
कोरोनाला भारतात आणनारा तो राहिला बाजूस
मार खातोय मात्र सामान्य माणूस…
परदेशातून येणाऱ्यांना सगळ्या सेवा..
रस्त्यांवर दिसणाऱ्यांना कसंही तुडवा…
कोणत्याच शंका न विचारून…
पोलिसही लागले मारू पाठी लागून…
सामान्य माणसांवर लाठीचार्ज करण्यापेक्षा…
निर्मात्यावरच कडक कारवाई करा ना त्यापेक्षा…
पटलं तर बघा थोडा विचार करून…
कारण मार खातोय मात्र सामान्य माणूस…
-माधवी अनिल तांबे,मुंबई.