कृतीतून विधायक कामास सुरुवात ……!
सामाजिक जाणिव काय असते त्यातून या विधायक काम कसे करता येऊ शकेल .केवळ कोरड्या चळवळी करून चालणार नसून त्याला कृतीची भर द्यावी लागेल .समाजातील अधिकाधिक वर्ग अजून ही मागास आहे त्यांचे मागासलेपण हे आर्थिक आहेच पण त्याच बरोबर बौद्धिक ही आहे . मुंबई च्या अनेक वस्त्यात आंबेडकरी तरुण व्यसन,बेकारी यांनी भरकटला आहे त्याचा विचार व्हावा .वस्त्यांमध्ये वैचारिक वादंग माजलेले आहे . तरुण दिशाहीन झालेत . यावर विचार व्हायला हवा.
आंबेडकरी चळवळीतील भारतीय लोकसत्ताक संघटना ही एक संघटना त्यांनी किमान या विषयाला भिडण्याचे धाडस केले .सोबत लोकहीतकारिणी संस्थेने सहकार्य केले आणि सामंजिक जाणिवेतून लोकांसाठी एक प्रशस्त स्टडी सेंटर ची उभारणी करण्यासाठी आर्थिक भार उभा करण्या साठी सामाजिक भान असलेल्या विषयावर कला कृती सादर केली.
सध्या स्थितीवर आधारित विचार करायला लावणारे एक नाटक म्हणजे “प्रेषित द प्रोफेट…” माटुंग्याच्या यशवंत नाट्य गृहात काल हा प्रयोग यशस्वी सादर झाला. चळवळीतील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांनी प्रचंड प्रतिसाद दिला .रत्नागिरी,कोल्हापूर,नागपूर,नाशिक,पुणे औरंगाबाद सारख्या चळवळीच्या बालेकिल्ला असलेल्या ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हजर होते.
सामाजिक भान असणारी कलाकृती सादर करणे ही मोठी जोखिंम असते ती सादर करून यशस्वी करणे ही अवघड असते .अद्वैत थिएटर ने व लेखक,कलाकार आणि सर्व समर्पितानी ती जबाबदारी छान पार पाडली .
लोकसत्ताक संघटना आणि लोकहीतकारिणी संघटना ह्या दोन्ही संघटनांनी संयुक्त कार्य करून समाजासमोर एक उदाहरण घालून दिले आहे.
www.ambedkaree.com आणि आर्थिक चळवळीत काम करणारी “अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन” आपल्या सोबत आहे .
-प्रमोद रा जाधव