भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना स्वातंत्र्यदिना निमित्ताने जनजागृती मोहीम.
“भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या” वतीने हाती घेण्यात आली मुंबईतील ५ विभागात पथनाट्य व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे .
भारत स्वातंत्र्य झाल्या पासून आज पर्यंत काही म्हत्वाच्या समस्या शासनाने प्रशासनाने हाताळायला पाहिजे होत्या त्या योग्य पद्धतीने हाताळल्या दिसत नाहीत, संविधानाची काटेकोर अमलबाजावणी होत नसल्यामुळेच स्वातंत्र्याची ७३ वर्षे उलटून हि मोठा वर्ग मुख्य प्रवाहा पासून लांब आहे.
नागरिकांच्या न्याय हक्काच्या लढाई साठी भारतीय लोकसत्ताक संघटनेने १४ मुद्दयावर आधारित “लोकक्रान्ती” आंदोलनाची सुरवात १५ ऑगस्ट २०१८ पासून सुरु केली या १४ मुद्दयामधील अतीमहत्वाच्या ५ मुद्द्यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले होते.१) एकसमान दर्जाचे व मोफत KG ते PG शिक्षण सर्व विद्यार्थ्याना उपलब्ध व्हावे.
२) एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पूर्वत सुरु करावेत.
३)स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी व नद्या जोड प्रकल्प राबवले जावेत.
४)जाती मुक्त भारत करण्यासाठी जाती भेद मुक्त अभियान, पंचवार्षिक योजना आदी उपाय योजना करण्यात याव्यात.
५)निवडणूक प्रक्रियेतून EVM मशीन हद्दपार करून सर्व निवडणूक बॅलेट पेपवरतीच घेण्यात याव्यात.
या ५ अतिमहत्वपूर्ण मुद्द्यावरील पथनाट्य प्रितेश धोंडू मांजरेकर सर यांच्यामुळेच ह्या सर्व मुद्द्यावरील “बलसागार भारत होवो” हे सुंदर असे पथनाट्य सादर झाले असे संघटनेचे अध्यक्ष मा.अमोल बोधिराज यांनी सांगितले .
महत्वाच्या मुद्द्यावरील स्क्रिप्ट तिचे उत्तम लेखन आणि उत्कृष्ट दिग्दर्शन मांजरेकर सरांनी केले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ‘लोकसत्ताकचे” कार्यकर्ते व “सिद्ध आर्टचे” कलाकार उत्तम सादरीकरण करू शकले,व असा महत्वपूर्ण संदेश पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकां पर्यंत पोहचवू शकलो असे ही बोधिराज यांनी म्हटले व त्यांचे आभार ही व्यक्त केले . ह्या पथनाट्या मध्ये कलाकाराची भूमिका बजावणाऱ्या लोकसत्ताकच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सिद्ध आर्ट च्या सर्व कलाकारांचे तसेच सर्वच कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार ही त्यांनी आवर्जुन मानले .हे पथनाट्य डिलाईरोड, सायन,कुर्ला, चेंबूर,घाटकोपर या विभागात सादर झाले या विभागातील सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱयांचे आभार
मानत आपली साथ अशीच राहुद्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
१५ऑगस्ट २०१९ च्या जनजागृती मोहिमेत सहकार्य करणारे मा.ऍड.रत्नाकर डावरे सर, मा.संजयजी पवार सर, मा.मकरंद तासगावकार सर, शशिकांत ढोणे साहेब,मा. गमरे साहेब, विलास कांबळे सर, जितेंद्र कांबळे गुरुजी, वैशाली मॅडम, मा.संतोष पवारजी, दादासाहेब यादव सर, शशांक कांबळेजी, रोहित जगताप जी,तसेच सिद्ध आर्ट नाट्य संस्था, सम्यक बुद्धविहार ट्रस्ट डिलाईल रोड. भारतीय लोकसत्ताक संघटना या सर्व मान्यवरांचे ही मा बोधिराज यांनी आभार व्यक्त केले व पुढील मोहिमेत वरील मान्यवरांची साथ व त्याचे मार्गदर्शन लाभेल अशी इच्छा व्यक्त केली.
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व भारतीयांसाठी असलेले कार्य, “मी प्रथम भारतीय अंतिमतः हि भारतीय.” हा त्यांचा संदेश प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. नागरिकांच्या न्याय अधिकार हक्काचा लढा, संविधानिक अंमलबजावणीचा लढा आपण असाच लोकांपर्यंत पोहचवत राहू व लोकजागृती घडवत राहू व खरा “बलसागार भारत” घडवण्याचा प्रामाणिक प्रयन्त करीत राहू.!असे ही ते शेवटी म्हणाले.
सभार : मा अमोल बोधिराज यांच्या FB वाल वरून
– शब्दांकन
शीतल प्रमोद जाधव
www.ambedkaree.com