लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ?
– तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो की, आपल्या वर्गात चळवळीचा वारा चहूकडे पसरला आहे. पण ही जागृती जरी झाली असली तरी सुध्दा मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हांला सांगायची आहे ती ही की, यापुढे तुमचे सर्व भवितव्य राजकारण आहे. तुमची स्थिती पालटण्यास, तुमचा उध्दार करुन घेण्यास आता तुम्हांला उपाय आहे तो म्हणजे राजकारण, कायदे करण्याची शक्ती. राजकीय सत्ता हेच आपले ध्येय असले पाहिजे.
– सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली राजकीय शक्ती हिच आहे.
– उच्च वर्गाच्या हातातून शासनसत्ता प्राप्त करुन घेण्यासाठी आपण संघटीत असलेच पाहिजे. तुम्हा सर्वांचा नेता एकच असावा, तुमचा पक्ष एकच असला पाहिजे आणि त्या पक्षाचा एक सुनिश्चित कार्यक्रमही असला पाहिजे.
– संघशक्ती उभी करण्याबरोबरच, दुसऱ्या पक्षाशी संगनमतही करावे लागेल. खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेचं फिरले आहे. आसासह चाक पुर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊचं शकत नाही, ते अर्धे चाक आम्हीचं फिरवू.
– जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हांला शासनकर्ता जमात बनायचे आहे.
-आपल्यासाठी बाबासाहेबांनी व्यापक दूरदृष्टीकोण ठेवून राजकारणावर सकारात्मक, प्रभावशाली, आश्वासक, सर्वसमावेशक, मार्गदर्शक अशी अनेक अनमोल मते मांडली आहेत.– मिलिंद कांबळे चिंचवलकर लेखक आंबेडकरी विचारवंत आणि अभ्यासक आहेत.