लक्ष्मण माने यांनी शेवटी आपला उपरेपणा दाखवलाच

लक्ष्मण माने यांनी शेवटी आपला उपरेपणा दाखवलाच. हे “उपरे ” जे आंबेडकरी चळवळीत कधी रुजलेच नाहीत ते प्रकाश आंबेडकरांना चळवळीबाहेर काढणार अशी कोल्हेकुई करीत आहे ह्या पेक्षा हास्यास्पद काही असूच शकत नाही.
विकाऊ माध्यमं जोरशोर मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ह्या सुपारीबाज एजंटचे paid interview दाखवून आंबेडकरांविरुद्ध अपप्रचार करीत आहेत आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा निषेध आहे. माने सारखे कित्येक आले आणि गेले तरी भारिप बहुजन महासंघाला किंवा या नवीन वंचित आघाडीला तडा तर जाऊ द्या पण साधा ओरखडाही पडणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. उलट मानें च्या गच्छंतीमुळे वंचित आघाडीतील अडगळ दूर होईल.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचे गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश आणि जनाधार बघून भल्याभल्यांचे डोळे पांढरे झालेत,काहींना राजकीय पॅरालिसिस झालेत, तर कित्येकांच्या पोटात यामुळे पोटशूळ उठला तर काहींची वाचाच बंद झाली!

बहुजन आणि मुस्लिम आघाडीचा हा क्रांतिकारी प्रयोग राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला चांगलाच भारी पडला तर भाजपाचीही त्यामुळे चांगलीच लाही लाही झाली!
अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारख्या मातब्बर नेत्यांचे पानिपत झाले आणि काँग्रेसचे डोळे खाडकन उघडले . विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात होताच थेट राहून गांधी यांचे कडून वंचित आघाडी बरोबर सन्माननीय युती व्हावी म्हणून आदेश आलेत.

आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे आपली कळीच्या नारदाची भूमिका वठवायला सुरवात केली आहे.पडद्या मागून युद्ध पातळीवर सूत्र हलवली जाऊ लागली आहेत.

याच तयारीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे पाळीव एजन्ट्स एकाएकी डोके वर काढू लागलेयत.
काही भाडोत्री एजन्ट्स तुकडे फेकले की भुंकणाऱ्या प्रकारात मोडतात तर काही आतल्या गोटात येऊन वंचितला फोडायच्या मागे लागलेत.
प्रकाश आंबेडकरांविरुद्ध लोकसभा निवडणुकांआधी सुद्धा भाजपाची बी टीम म्हणून भरपूर अपप्रचार केला गेला त्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सामील होते मात्र निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आणि वंचित आघाडीचे यश बघून काँग्रेस सध्यातरी नांग्या टाकून आहे मात्र राष्ट्रवादीने आपली पडद्या मागची भूमिका पार पाडायला सुरवात केली आहे कारण सत्तेवरील अंकुश कोणत्याही मार्गे यांना स्वतःकडे ठेवायची सवय लागली आहे.

मात्र लक्ष्मण मानेंच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ‘राष्ट्र वादीने लक्ष्मण मानेसारखे अनेक साप पायात सोडले तरी त्यांच्या जहरी फण्याला घाबरण्याइतके प्रकाश आंबेडकर कमकुवत निश्चितच नाहीत आणि हे सर्व सामान्य बहुजन समाज बऱ्यापैकी समजून चुकला आहे त्याचीच चुणूक लोकसभा निवडणुकीत दिसली आहे.

खरंतर पाच पंचवीस पोसलेल्या लोकांव्यतिरिक्त मानेकडे कुणी भटके विमुक्त ढुंकूनही बघत नाही.
त्यामुळे वंचित आघाडीतील कोणीही मानेच्या विभिषणगिरीला कवडीचेही महत्व देत नाही आणि मानेच्या करवी राष्ट्रवादीने चालविलेले हे कट कारस्थांन प्रकाश आंबेडकरांचे काहीही वाकडे करू शकणार नाही.
माने आंबेडकरवादी जनतेसाठी ‘उपरे’ होते आणि ‘उपरेच’ राहणार हे त्यांनी स्वतःच्या करणीने सिद्ध केले आहे .
आता उर्वरित आयुष्य त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्तालोलुप पायथ्याशी बसुन त्यांची हुजरेगिरी करावी!
‘जयश्री इंगळे ‘

प्रस्तुत लेखिकेच्या FB वॉल वरून सभार,
प्रस्तुत लेखिका पत्रकार असून विविध प्रिंट आणि ऑनलाइन मीडिया त्या लिहीत असतात.

Next Post

स्वतःच्या अनुभवातून सुरू केला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टुरिझम चा व्यवसाय ....!

रवि जुलै 7 , 2019
कल्याण शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या संजय शिरतुरेंची गरुड भरारी. नौकरीत असतांना वैयक्तिक official टुर्सचा स्वतःचा अनुभव संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वोत्तरी राज्य, आणि थाईलँड, श्रीलंका, भूतान, सिंगापोर, मलेशिया, द.कोरिया, चायना, हॉंगकॉंग, जपान, दुबई, जर्मनी, घाना, युगांडा, कॅनडा, […]

YOU MAY LIKE ..