कालकथीत बौद्ध साहित्यिक विजय सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन दि.३० जुन २००५.
—————————————-
-सुनिल सोनवणे,संपादक,प्रकाशक आणि लेखक -उल्हासनगर
—————————————
बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक व दलित साहित्य का नको? या ग्रंथाचे लेखक कालकथीत बौद्ध साहित्यरत्न
विजय सोनवणे यांचा जन्म ११आॅगस्ट१९४० मध्ये कसबे तडवळे,जि.उस्मनाबाद येथे झाला.ते विक्रीकर भवन, मुंबई येथे असिस्टंट कमिशनर म्हणुन कार्यरत होते.ते उल्हसनगर येथे रहात होते.त्यांच्या येथिल वास्तव्याने येथील परीसर बौद्ध धर्म,साहित्य आणि संस्कृतीचे केंद्र तसेच महाराष्ट्त उल्हासनगर चे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे स्थान बनले होते.
‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद’ या डॉ.आबेडकर प्रेणीत बौद्धांच्या मातृसंस्थाचे ते उपाध्यक्ष व सहसचिव म्हणुन कार्यभाग सांभाळत असत. संस्थापक आप्पासाहेब रणपिसे, भाऊसाहेब अडसूळ व विजय सोनवणे या त्रयीचा आंबेडकरी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या व बौद्ध समाजाच्या अस्मितेचा उद् घोष करणाऱ्या बैध्दसाहित्य आणि संस्कृतीचे बिजारोपण करण्यात सिंहाचा वाटा आहे.डाॅ. आंबेडकराचे समग्र साहित्य शासनाने मुद्रीत करावे, ‘महाराष्ट्र मराठी साहित्य संस्कृती मंडळावर’ मागासवर्गीय प्रतिनिधीची निवडकरावी ई. अनेक मागण्याचा त्यांनी अग्रह धरला.
विजय सोनवणे यांचे स्वता:चे ग्रंथालय आहे.दलित साहित्य का नको? हा त्यांचा गाजलेला ग्रंथ. पाश्र्चात्य ग्रंथ आणि विचारवंत, पालीभाषा बुध्दवाणी, अनेक कथा, आम्रपाली नाटक,शांतीदीप चरित्र, सौंदरानन्द, बुद्धचर्य अवतार, बौद्ध साहित्य आणि सम्यक क्रांती ही प्रकाशित पुस्तके, तसेच बौद्ध कला,शिल्प, साहित्य व संस्कृती, कामगार कल्याण या विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. आकाश वाणीवर त्यांची भाषणे प्रसारीत झाली आहेत.ते ‘अस्मिता शैक्षणिक धम्मविषयक साहित्य परिषद,’ यासंस्थेने व फुले आंबेडकर साहित्य,विक्रोळी यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पालीटेक सोसायटी,वरळी, मुंबई चे ते संस्थापक सदस्य होते.अॅड.बी.सी.तथा बापूसाहेब कांबळे,राजा ढाले,ज.वी.पवार,वामन ओव्हाळ,सचित तासगावकर
यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद’या आंबेडकरी समाजाच्या १९५० स्थापलेल्या संस्थे ने महाराष्ट्रत २५ बौद्ध साहित्य संमेलने आयोजन केली.तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या’अस्मिता शैक्षणिक धर्मविषयक साहित्य परिषद, उल्हासनगर-४ या संस्थेने ७ बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यास डॉ.यशवंत मनोहर, डॉ.गंगाधर पाणतावणे,अॅड.मा.म.देशमुख,वसंत मून,या.श.मोरे, डॉ.एस.एस.नरवडे, डॉ.गोबले, डॉ.एल.वाय औचरमल, डॉ.राम साबळे, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.एस.पी. गायकवाड. प्रा.रतनलाल सोनग्रा, प्रा.हरी नरके, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे,वामनदादा गायकवाड,बाबा गाढे इ.उपस्थित होते.
आश्या ह्या आंबेडकरी त्वज्ञानाच्या ‘बौद्ध साहित्याचा’ पुरस्कार करणाऱ्या विजय सोनवणे यांचे दि.३० जुन२००५ रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या सामाजिक, धार्मिक, साहित्य व सांस्कृतीक कार्याला विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली.
–सुनिल सोनवणे