आदिवासी वारली कलेला जगमान्यता देणारा कलावंत काळाच्या पडद्याआड……….!
आदिवासी समाजात लग्नसमारंभात सुंदरश्या वारली चित्रांची पर्वणी असते वारली समाजातील फक्त विवाहित महिलांना ती लग्न समारंभांमध्ये सुंदर अशी वारली चित्रे काढण्याची परवानगी होती. वयाच्या १३ व्या वर्षी एक तरुण चित्रकाराने ही परंपरा मोडीत काढण्याचे ठरविले आणि स्वतः वारली चित्रे काढणत्यास सुरवात केली अदिवासी समजत असा पहिला प्रयोग करणारा तो तरुण म्हणजेच ज्याने जगभर आपल्या वारली चित्रं आणि कलेने ओळख निर्माण केली ते जीवा सोमा माशे .
डहाणूपासून जवळ असलेले गंजद हे त्यांचे गावचे माशे यांनी वारली समाजातील अनेक नृत्य प्रकार,तारपा सारखी वाद्ये ह्यांना समोर आणून एक उपेक्षित कला जगाच्या कालाविश्वात सन्मानाने उभी केली .जगभरात त्यांची चित्रे प्रसिध्द आहेत वयाच्या 13 व्या वर्षांपासून ते 66 व्या वयापर्यंत ते सातत्याने आपली कला सादर करीत होते .
माजी पंतप्रधान दि इंदिरा गांधी यांना त्यांच्या कलेची माहिती मिळाली त्यांची मेहनत आणि हुशारी पाहून त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा ते प्रथमच प्रकाश झोतात आले त्यांनंतर मात्र ते सतत आपली कला संस्कृती जगभर पोहचवता राहिले जगभरात विविध ठिकाणी आपले चित्राचे प्रदर्शन भरून त्यांनी खऱ्या अर्थाने वारली आदिवासी कलेची ओळख करून दिती आणि सन्मानाने या कळेल जगभर मनाचेस्थान निर्माण केले .
वारली आदिवासी संस्कृती चा प्रार आणि प्रचार व्हावा म्हणून त्यांनी विविध कार्यशाळा घेतल्या .त्यांच्या मागे त्यांचा मुलगा जगभर होणाऱ्या काळाप्रदर्शनात त्यांची चित्रं घेऊन जात असतो .
अशा महान कलाकाराने जगला वारली चित्रकलेची ओळख करुन दिली तसेच या कलेला प्रसिद्धी मिळवून दिली त्या आदिवासी समाजातील जिव्या सोमा माशे यांचे मंगळवारी १५ मे ला सकाळी राहत्या घरी वद्धापकाळाने निधन झाले, ते ८४ वर्षांचे होते.
वारली चित्रकला ही आदिवासी कला टिकवून ठेवल्याबद्दाल तसेच तिला प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल दि. माशे यांना भारत सरकारने प्रतिष्ठीत पद्मश्री किताबाने गौरविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
-प्रमोद रामचंद्र जाधव