Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी?
पावसाने मनुष्याचे चांगलेच गर्वहरण केले आहे. आपल्यासारखा सर्व शक्तीमान कोणी नाही असा वृथा व दांभिक अभिमान बाळगणा-या माणसा तू किती क्षुद्र आहेस असेच जणू पावसाला म्हणायचे असेल काय? आज म्हणजे आता १२ वाजून १५ मिनिटांनी तीन दिवस दडी मारून बसलेल्या पुष्य नक्षत्राच्या जोरदार सरी कोसळल्या. कोकणात भाताच्या वाढीबरोबरच पीक पोसायला पुष्य नक्षत्र फार महत्वाचे असते असा समज आहे. गत वर्षी पावसाचे थोडे उशीराच आगमन झाले. दरवर्षी ७ जूनला येणारा पाऊस मागील काही वर्षांपासून २२ जूनलाच येत असल्याचे पाहवयास मिळते. परंतु यंदा हा नियम सुद्धा त्याने धुडकावला. पावसाच्या उशीरा येण्यामागील कारण ‘ अल निनो’ या वादळाशी संबंधीत आहे. कारणे काहीहि असली तरी त्याचा संबंध मानवी जीवनाशी असल्याने, या कारणांचे निर्माण होण्यास मनुष्यही तितकाच जबाबदार आहे हे आता स्षट झाले आहे. पैकी पर्यावरणाचा होत चाललेला -हास हे एक कारण सांगातले जाते. अर्थात पर्यावरणाची समस्या ही केवळ भारत देश तथा भारतीय नागरिकांचीच राहिलेली नसून, अवघ्या जगाची समस्या बनली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास वृक्षतोड हे प्रमुख कारण असल्याचे सा-या जगाने मान्य केले असून, भारतात जेवढी वृक्षतोड होत नाही त्याच्या कित्येक पटीने परदेशात झाडांची कत्तल होत असते. जंगलांना आगी लावण्याजे छुपे प्रयत्न काय सांगतात? भारतात तरी काय वेगळे चित्र आहे? शहरांना काॅस्मोपाॅलिकन चेहरा मिळवून देण्यासाठी सरकार कंबर कसून काम करीत आहे. या देशातील भांडवलदारी अर्थव्यवस्थेची मर्जी संपादन करण्यासाठी सरकार कसे पायघड्या अंथरत असतात याचे चित्र आपल्या समोर आहे. सर्वसामान्यांना घरासाठी सरकारकडे जागा नसते पण, बड्या उद्योजकांसाठी रातोरात भूखंड तयार होतात हा चमत्कार नाही तर काय म्हणायचे?
मुंबईचा मागील काही वर्षात बदलेला चेहरा काय सांगतो? आधुनिकतेच्या नावाखाली टोलेजंग इमारती उभ्या करण्याचे मनसुबे कोणी आखले? या संकल्पनेचा पाया कोणी घातला ? सर्वसामान्यांचे शहर अशी कधीकाळी ओळख सांगणारी मुंबई महानगरी, आता सामान्यांची राहालेली नाहि हे विदारक सत्य कोणी निर्माण केलले याचा पाठपुरावा आम्ही मुंबईकर असल्याचा खोटा, तकलादू अहंभाव जोपासणा-यांनी केला पाहिजे. मुंबईचा ७/१२ कोणाच्या नावावर होता? आता कोण नावे लावू पहात आहे हे जाणून घ्यायची कोणाचीच तयारी दिसत नाही. हे औदासिन्य येण्यामागे मुंबईकर म्हणविणारा, कधीकाळी बेंबीच्या देठापासून’ मुंबई आमची नाही कोणाच्या बापाची ‘ या शब्दात ओरडून सांगणारा, मूळ मालक कोठे आहे? त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना दिसतात. पण लोक आजही पाषाणवत झाल्यगत वाटतात.
आपले अधिकार नव्हे अस्तित्व हारावून घेतले जात असताना मुंबईचा हा मूळ मालक अधिकारासाठी रस्त्यावर येण्यास तयार नाही. त्याच्या अधिकारासाठी उरणचे सुपुत्र, वंचित आघाडीचे नेते आगरी कोळी समाजातील विचारवंत राजाराम पाटील न्यायालयीन लढाई लढत आहेत! ओबीसी समाजाच्या ७/१२ चा ते शोध घेत असून जे कोणी अधिकारापासून खरोखरीच वंचित, उपेक्षित राहिले असतील अशांचा शंध घेत आहेत. परंतु हा माणूस तथा त्याच्या घटकाला उपेक्षेची जाणिवच होत नाही. मी गेले काही दिवस-वर्षे या मागील कारणांचा शोध घेत आहे. राजाराम पाटील यांच्याप्रमाणेच ” मी दक्ष मुंबईकर” या अभियानाचे प्रमुख डॉ. दिपक गायकवाड आणि त्यांचे तमाम सहकारी त्यांच्या परिने काम करित आहेत. तरीदेखील हा माणूस हलायला तयार नाही. याचे कारण हा मनुष्य ‘आॅटिझम ‘ चा बळी ठरलेला दिसतो. सांस्कृतिकतेच्या नावाखाली त्याचे इतके शोषण झाले आहे की, त्याचा मेंदूच बधीर झाला!बधिरता म्हणजे संवेदनाच गोठल्याने तो जागेपणीच मृत दझाला इतके भयानक वास्तव आटल्यासमोर आहे. कधीकाळी मुंबईचा मालक असलेला
आगरी -कोळी बांधव आज कोणाच्या ओंजळीने पाणी पित आहे? त्याच्यावर ही वेळ का आली?
आग-यांच्या जिवावर बहुजनांच्या उड्या होत्या.
माणुसकीच्या या ओलाव्यानेच इथे आलेल्या माणसाला जगण्याची उमेद व विश्वास देवून गेला.
१७-१८व्या शतकात युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीचे पडसाद व प्रभाव आशिया खंडावर उमटला. व्यापारनिमित्त आलेल्या ब्रिटिशांनी पं.बंगालमध्ये साम्राज्याचा पाया घातल्यानंतर तंत्रज्ञान तथा यंत्राच्या सहाय्याने चालणारे उद्योग सुरु केले. त्याचे झालेले परिणाम आपल्यासमोर आहेत. इंग्रज गेले तरी त्यांनी सुरु केलेल्या गिरण्या ८० च्या दशकापर्यंत सुरु होत्या. तोपर्यंत भांडलदारी अर्थव्यवस्थेने ब-यापैकी पकड बसविली होती. लोकशाहीत सत्ता कोणाचिही असली तरी अंकूश भांडवलदारांचाच होता. २०१३-१४मध्ये अरविंद केजरीवाल आणि गाधीशिष्य अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकपाला ‘च्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सर्वसामन्यांचा किती फायदा झाला? या आंदोलनाला कोणी रसद पुरविली? याची चर्चा होत असतानाच भाजपचे अनेक नेते आघाडीवर दिसू लागल्याने सदर आंदोलनाचे बोलवाते धनी भाजप होती हे यथावकाश का होईना जनतेच्या लक्षात आले. अगदी तोच प्रकार गिरणी कामगारांच्या संपाची हाक देताच घडत गेला हे वास्तव आहे. गिरणी कामगारांना अभय व संरक्षण देवून गिरण्या बंद करण्यास भाग पाडणारे मराठी माणसाच्या हिताचे काम करित होते काय हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवला जातो, याचे कारण जाब विचारणारा लढवय्या मराठी माणूस कोमात गेला हे सांगता येईल. त्याला बाहेर काढण्याचे काम वंचित आघाडीच्या माधयमातून होत असतानाच, त्याला धर्म आणि संस्कृतिच्या बेडीत अडकवायचा प्रयत्न होत आहेत. संघर्ष अटळ आहे. प्रश्न हातघाईकरून सुटणारे नाहीत, त्यासाठी बौद्धिक लढाई हाच पर्याय आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारच ही लढाई लढू शकतो. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थाप् अध्यक्ष हनुमंत उपरेकाका यांनी धर्मप्रमाण्यवाद्यांनी बंद केलेले दरवाजे बहुजनानसाठी खुले केले असून, आत येण्याचे मार्ग आता सोपे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिषदेचे काम मोठ्या निष्ठेने व धाडसाने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असलेले विद्यमान अध्यक्ष उल्हास राठोड यांच्यामागे वंचित समाज ताकदीने उभा राहिल ही अपेक्षा आहे.
अॅड.बाळासाहेब आंबडकरांच्या मार्गदर्शनाखाली वंचित आघाडीच्या नावाखाली सुरू असलेला लढा हा राजकीय असला तरी तो एक प्रयोग आहे. मात्र हा प्रयोग कराताना तोंडाला रंग ( मेक अप) फासून नकली मुखवटे धारण करण्याची भूमिका नसल्याने वंचितांची राजकीय विंग प्रभावी करणे जेवढे गरजेचे आहे तितकेच, धम्म चळवळीला गतिमान करण्याची गरज आहे. ही गतिमानता येण्यासाठी विविध संस्थांचे लोक, कार्यकर्ते एका आज पायावर उभे आहेत. शांताराभ आंग्रे, अंजन वेलदूरकर, कांचन नाईक, सागर घाणेकर, कृष्णमूर्ती, शंकरदादा लोखंडे, सूर्यकांत खरात असे हजारो कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत. आता व्यूहरचनेबरोबरच ठोस व विधायक कार्यक्रम कसा ठेवातात यावर सारे निर्भर असेल!
जयभिम, जय बुद्ध, जय भारत!!
गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
बुधवार दि. २४ जुलै,२०१९