आरक्षण लाख द्याल;नोकऱ्या कुठून आणणार? – परिसंवाद

आरक्षण लाख द्याल;नोकऱ्या कुठून आणणार?
शुक्रवारी पत्रकार संघात परिसंवाद

मुंबई दि 22 जुलै: आरक्षणाचे लाभार्थी बनणाऱ्या समूहांची संख्या वाढली असतांनाच नोकऱयांच्या संधीचा मात्र दुष्काळ आहे। हे भीषण वास्तव मांडणारा ‘आरक्षण लाख द्याल; नोकऱ्या कुठून आणणार?’ हा सवाल बुलंद करणारा एक परिसंवाद येत्या शुक्रवारी 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडणार आहे।

‘आरक्षण ‘ या संकल्पनेचे जनक राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात 1903 सालात 26 जुलै रोजीच मागासांसाठी आरक्षण लागू केले होते। त्याच्या समरणार्थ ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेने हा परिसंवाद आयोजित केला आहे।

त्या संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादाला माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हे प्रमुख अतिथी असून परिसंवादाचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे करणार आहेत।

या परिसंवादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते आमदार भाई जगताप,भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, ज्येष्ठ गांधीवादी नेते जयंत दिवाण हे प्रमुख वक्ते आहेत, अशी माहिती या परिसंवादाचे संयोजक, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी एका पत्रकाद्वारे दिली। ते ‘गणराज्य अधिष्ठान’ चे सरचिटणीस आहेत।

मराठा समाजाला नुकतेच आरक्षण मिळाले असून धनगर समाजालाही ते मिळण्याची अपेक्षा आहे। मात्र नोकऱयांच्या संधीअभावी ते आरक्षण निरुपयोगी ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे खासगी उद्योगासाठी आरक्षण धोरण लागू करण्यावाचून तरणोपाय राहिलेला नाही, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे।

Next Post

बदलापूर- वांगणी मुसळधार पाऊस बदलापूर वांगणी पूरस्थिती

शनी जुलै 27 , 2019
मुबई,कल्याण ,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर मुसळधार पाऊस 26 जुलै 2015 चीच पूरपरिस्थिती बदलापूर पाण्याखालील बदलापूर येथील नागरिकांचे हाल. बदलापूर पश्चिम भारत कॉलेज,हेंन्द्रे वाडी, रमेश नगर ,बदलापूर स्टेशनवर परिसर पाण्याखाली. । आणखी दोन ते तीन सात पाऊस पडला तर अपतकालीन स्थिती. वांगणीत महालक्ष्मी […]

YOU MAY LIKE ..