डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकास उद्देशून लिहीलेल्या “खुल्या पत्रावर” आधारीत “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची” स्थापना नागपूर मुक्कामी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली.
पक्ष स्थापनेचा ठराव खासदार अॅड.बी.सी. कांबळे (मुंबई)यांनी मांडला. या ठरावाला पाठिंबा म्हैसूर प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी आमदार आरमुगम यांनी दिला. रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे” अखेरचे अधिवेशन ३ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमिवर भरले आणि त्याच ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. मद्रास (तामीळनाडू) मधील वयोवृध्द नेते आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत निकटचे सहकारी श्री. एन.शिवराज यांना पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.
सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाची आवश्यकता असते या दृष्टीनेच या पक्षाची काँग्रेसला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्थापना करण्यात आली.रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या वेळी सात ते आठ लाखाचा समुदाय जमला होता. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होत असताना १८८५ साली केवळ ७२ सदस्य एकत्र आले होते.
पुन्हा एकदा देशातील पीडित शोषित लोकांचा आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्हावा आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आंबेडकरी जनतेने वाटचाल करावी असे वाटते.
बाबासाहेबांच्या जनतेला आम्ही अवाहन करितो की, त्यांनी याच पक्षाची सेवा करावी.
-प्रभाकर जाधव – राष्ट्रीय उपाध्यक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(कांबळे)