पुन्हा असे घडू नये या साठी. “उतरंड” चित्रपट प्रदर्शित होतोय..!

चित्रपट निर्माण करणे म्हणजे स्वतःच्या डझन भर मुलींचे लग्न जुळवून थाटामाटात लावून देण्या सारखे आहे. 2003 साली उम्मीद हा हिंदी सिनेमा बनवायला सुरुवात केली. करोडो रुपये उभे केले. प्रचंड अडचणी पार केल्या पण अखेर जातीयवाद आड आलाच.परंतु स्वतःच्या हिमतीवर काही मोजक्याच ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करून, अनेक उठाठेवी करून निर्मात्याला पैसे परत मिळवूनच दिले. निर्माते पुन्हा पाठीशी उभे राहिले.


उतरंड ला सुरुवात केली, विषय अत्यंत कठीण.. कठीण म्हणजे अगदी जीवघेणा विषय 1956 नंतर मनुवाद्यांनी केलेल्या वंचितांच्या सर्वच हत्याकांडांचा !


त्यातल्या त्यात मध्यवर्ती स्थानी खैरलांजी सारखी महा भयानक घटना. अत्यंत कारुण आणि दारुण. मला वाटले कि इरफान खान भैय्यालालची भूमिका छान करू शकेल कारण भैय्यालाल प्रमाणेच त्याचे मोठे मोठे डोळे आणि अभिनयातली इरफानची सहजता या गोष्टीमुळे मी इरफानशी बोललो…


आम्ही एकाच स्कूल चे (NSD)चे शिवाय माझ्या सोबत अनेक workshop मध्ये अभिनय शिकवतांना आमचे चांगले मैत्रीचे संबंध निर्माण झालेले होते.


“भाई मैं चाहता हू कि भैय्यालाल का रोल आप करो…”


यार सुदाम, फिल्म ऐसी चीज है जो सिर्फ पैसे कमाने के लिये की जाती है… तुम्हारा समाज परिवर्तन.. वगैरह वगैरह ये बाते मेरे समझ में नही आती. समाज परिवर्तन करना है तो आंदोलन वगैरह करो, भाषण दो, ‘किताब छपवावो… फिल्म काहेको बनाते हो?


भाई, गुजरात मे हजारो लोगोंका कत्ल किया गया ऊसपे खालिद साब ने फिल्म क्यू बनायी?.. क्योंकी फिल्म से बडा प्रभावी दुसरा माध्यम नही है दुनियामे लोगों को होश मे लाने के लिये !और भाई हमारा समाज तो अब भी बहोत बिखरा और पिछडा हुआ है.. इस बिखरे हुये समाज को जगाने का इससे बडा तारिका और क्या हो सकता है?


ठीक है लेकिन मै भैय्यालाल का रोल नही करुंगा !


तो फिर क्या फायदा?


देखो सुदाम, भैय्यालाल जैसा ट्रॅजिक और हेवी character बॉलिवूड तो बहोत दूर कि बात है आजतक हॉलिवूड में भी नही दिखा. बहोत कठीण character है, उसे निभाना बहोत मुश्किल है !या यु कहिये की बडा जानलेवा character है!
गाववालो ने निकाली हुई बीबी और बेटी कि नंगी परेड देखना…खानदान के चार चार लोग मरे हुये देखना, बहोत डिप्रेसीव है… नही यार मै नही कर सकता.


तुम मुझे टालने की कोशिश कर रहे हो इरफान भाई.


अरे नही बिलकुल सच कहता हू, बडे भयानक हादसे से गुजरा हुआ आदमी है भैय्यालाल, उसकी जगह मै होता तो शायद फोउरन हार्ट अटॅक से उपर गया होता, उसका रोल अदा करना कोई खेल नही है… काल्पनिक चरित्र होता तो ( तो चुटकी वाजवत बोलला ) यु यु कर लेता.. लेकिन जिता जागता कॅरेक्टर है भाई, और वो भी दुनिया का सबसे ट्रॅजिक सबसे खतरनाक कॅरेक्टर.उसका रोल करने के लिये मुझे कम से कम एक दो महिने उसके साथ रहेना पडेगा! और तुम तो जानते हो इतना समय नही है मेरे पास ! इसलिये दुसरा कोई भी रोल दो मै कर लुंगा !


आपके पैसे आपको मिल जायेंगे भाई, इसकी मैं ग्यारंटी देता हू !


बात पैंसों की नही है सुदाम… मुश्किल से मुश्किल character की है…

इरफान च्या विचारांशी मी सहमत होतो, नंतर अनेकांना मी अप्रोच केला. पण सर्वांनीच इरफान सारखाच  केला.

अखेर मलाच हा रोल करावा लागला.आणि भैय्यालालची भूमिका करतांना क्षणोक्षणी क्षणी जाणवत गेलं की इरफान खरंच बोलत होता.. की जगातला सर्वात ट्रॅजिक रोल म्हणजे भैय्यालाल !
मुलीचं छिन्न विछिन्न प्रेत, मुलांचे लचके तोडलेले मृतदेह, पत्नीचा ठेचा झालेला मेंदू आणि चिथड पिथड झालेली छाती बघून… भैयालाल ना लागलेले वेड..! रात्री बेरात्री कुठेही पळणारा, कोनाड्यात लपणारा, हंबर्डे फोडून रडणारा माणूस म्हणजे भैय्यालाल !


एका प्रसंगाने तर आधीच मेलेल्या भैय्यालाल ना आणखीनच उध्वस्थ केले. मुलींच्या वसतिगृहात नोकरींस ठेवण्या साठी interview घेण्यात आला, तेव्हा समाज कल्याण सुप्रीटेंडेंट म्हणाली जो माणूस आपल्या बायको आणि मुलीला नाही वाचवू शकला तो आमच्या मुलीचे काय रक्षण करणार? या प्रसंगा नंतर भैय्यालाल पुरते खचून गेले. स्वतःला भगोडा समजू लागले त्यांना खूप मोठ्या सायकॅट्रिस्ट थेरेपी आणि भयंकर ट्रीटमेंट मधून जावे लागले…


चित्रपटात भैयाजींचं बिघडलेले मानसिक संतुलन साकारता साकारता माझे स्वतःचे देखील संतुलन बिघडले आणि आज पर्यंत मी देखील सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेतोय. पोलीस स्टेशन मध्ये भैयाला ना इन्स्पेक्टर ने दिलेली वागणूक, नंतर काही राजकारण्यांनी केलेली प्रतारणा. खूप अवघडसा प्राणांतिक प्रवास आहे त्यांचा.


इरफान आज हयात नाही सांगायचंच राहून गेले त्याला माझे अनुभव. शूटिंग च्या दरम्यान एकीकडे डोळ्यातुन आसवे गळत होती आणि दुसरीकडे आम्ही अत्याचाराचे चित्रीकरण करत होतो. सर्वच कलाकारांचे डोळे पाणावलेले असायचे.


आमच्या स्त्री कलावंतांनी त्या माय लेकींची भूमिका अशी जीव ओतून केली की त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आम्ही अनेकदा आभार मानले. भय्यालालच्या मुलांच्या भूमिका ज्या दोन तरुणांनी साकारल्या त्या देखील तितक्याच जीवघेण्या होत्या दोन दिवस मुलं अक्षरशः विवस्त्र विना चड्डीचे राहून काम करत होती..


ओरडून ओरडून तर त्यांचे खूप हाल झाले. म्हणायचे सर आमचे सोडा हो त्यांनी कसं सहन केलं असेल याची कल्पनाही करवत नाही आम्हाला! त्या कुटुंबाने इतक्या यातना, सहन केल्या इतक्या यातना की शेवटी त्या यातना देखील कंटाळल्या. गलीत गात्रांनी विव्हळणेच सोडून दिले आणि चौघेही मुक्या मुक्यानेच मेले ! कारण मेंदूने संवेदनांशी connection च तोडून टाकले होते .

अनुभव पुन्हा कधीतरी…..! असे खूप अस्वस्थ करणारे अनुभव आहेत खैरलांजीचे आणि त्याच्या चित्रीकरणाचे.. अडचणी इतक्या की त्या अडचणींवर एक सिनेमा बनेल.लिहीन कधीतरी.

बंधूंनो म्हणून उतरंड सिनेमा बघणे आपले सामाजिक कर्तव्य आहे.. सिनेमा पलीकडचा सिनेमा आहे ‘ उतरंड ‘ समाज जागृतीची, एकीची चळवळ आहे उतरंड

आपला हा चित्रपट 25 ऑक्टोबर ला आपल्या सर्वांच्या साक्षीने नेटवरून प्रकाशित होत आहे.


🩸 चित्रपट बघन्या करिता कृपया सदस्य बना !
रूपये 200/500/1000/ जमेल तसें जमा करावे ही विनंती!

Google pay 9820208028

Bank of Maharashtra
A/C.20026168987
Andheri west Mumbai – Ifsc MAHB 0000902
सुदाम वाघमारे
लेखक/दिग्दर्शक
आंबेडकराईट इंटरनॅशनल मिडिया अँड मोव्हमेंटस (AIM2)

लेख मनाला भावला असेल तर कृपया call करून आपल्या प्रतिक्रिया कळवा -9820208028, 9833777250

Next Post

आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली "रिपब्लिकन मर्चंट असोसिएशन" ची स्थापना

रवि ऑक्टोबर 18 , 2020
नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) तुर्भे येथील मार्केटमध्ये व्यापारी असोशिएशनची स्थापना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापना झाली आहे. या असोशिएन चे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर असून , सचिव वसंत वाघमारे आहेत. कोषाध्यक्ष सुरेशभाई नरोडे. येथील व्यापाऱ्यांच्या विविध […]

YOU MAY LIKE ..