कोरोनापासून वाचायचंय? ही घ्या गोळी….. आर्सेनिक अल्बम 30

———————-
■ आयुष मंत्रालयाच्या सल्ल्याकडे
सरकारचे दुर्लक्ष कसे?: डॉ हरिष आहिरे ■


◆ दिवाकर शेजवळ ◆
divakarshejwal1@gmail.com

मुंबई, दि 29 मार्च: कोरोनाच्या महामारीवर अलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये प्रतिबंधक वा निवारक औषधे सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्या पार्श्वभूमीवर,कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच होमिओपॅथीमधील आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या नागरिकांनी घ्याव्यात, असे मार्गदर्शक निर्देश दिले आहेत. तरीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्या औषधांचे विनामूल्य वाटप करण्याबाबत केंद्र आणि राज्यांची सरकारे उदासीन राहिल्याचे उजेडात आले आहे.

एकट्या तेलंगणा सरकारनेच त्या राज्यात आणि विमानतळांवर होमिओपॅथीच्या गोळ्यांचे नागरिकांना मोफत वाटप सुरू केले आहे. त्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत अत्यल्प असून तो आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचाच परिणाम आहे, असा दावा मुंबईतील डॉ हरिष आहिरे यांनी केला आहे। ते औषध माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढवत असल्याने आजारांना प्रतिबंध करते, असे त्यांनी सांगितले.
डॉ आहिरे हे घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील सोना नर्सिंग होम या खासगी रुग्णालयाचे संस्थापक- संचालक असून होमिओपॅथी उपचार पद्धतीचा त्यांचा तब्बल 45 वर्षांचा अनुभव आहे. ते केंद्र सरकारच्या नवी दिल्लीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे सध्या सदस्य आहेत.

आपण स्वतः मुंबईत रमाबाई कॉलनीसह मुलुंड डम्पिंग ग्राउंड, चांदीवली येथील संघर्ष नगर आदी वसाहतीत रहिवाशांना आरोग्य शिबिरातून होमिओपॅथीच्या त्या गोळ्यांचे वाटप केले आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्या वसाहतीत गोळ्यांचे वाटप झालेल्यांपैकी कोणाला कोरोनाची बाधा झाल्यास आपणास अवश्य कळवावे, असे आपण स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले आहे. मात्र त्यातील कोणालाही बाधा झाल्याची तक्रार अद्याप आलेली नाही.

तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी होमिओपॅथी पद्धतीच्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे जनतेला विनामूल्य वाटप सुरू करावे, अशी आग्रही मागणी डॉ आहिरे यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोनापासून बचावासाठी सर्वस्वी लॉक डाऊनवर भिस्त ठेवू नये, असा सल्लाही डॉ आहिरे यांनी दिला आहे.


महाराष्ट्र सरकारने अलोपॅथी उपचार पद्धतीच्या लॉबीच्या दबावाखाली येऊन कोरोनाच्या महामारीत होमिओपॅथी पद्धतीच्या उपचारांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कुठे मिळतील या गोळ्या ?

****************

होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या त्या उपचार पद्धतीच्या औषधांची विक्री करणाऱ्या सुमारे 100 मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. त्यात मरीनलाईनला पारसी, झोरॅष्ट्रियन, रेडियन्ट, रॉय अँड कं., बनाजी, बॅक अँड कौल, चेंबूरमध्ये न्यू इंडिया, अदिती, पॉप्युलर, घाटकोपर मध्ये झोरॅष्ट्रियन, भांडुपला ट्रू हेल्थ, कुर्ला नॅशनल, ओम सिद्दीविनायक जुहू, वागड घोडबंदर, नौपाडा ठाणे, डिव्हाईन मीरारोड, रामा ठाणे, कामधेनू अंधेरी, अशा होमिओपॅथीक फार्मसीचा समावेश आहे.

गोळ्या कशा घ्यायच्या?

**************

आर्सेनिक अल्बम 30 या 4-5 गोळ्या सकाळी काहीही खण्याच्याआधी सलग तीन दिवस घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला पुन्हा तीन दिवस घ्याव्यात, असे डॉ हरिष आहिरे यांनी सांगितले.डॉ.हरिष आहिरे,मुंबई यांचा संपर्क क्रमांक अधिक सविस्तर माहितीसाठी देत आहोत:+917798812162
●●●●●●●●●●●●●

Next Post

कोरोनाविरोधात जंग :रेल्वेत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप सुरू!

सोम मार्च 30 , 2020
कोरोनाविरोधात जंग :रेल्वेत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप सुरू! ***************** कोरोनापासून बचाव करण्यासाठी मध्य रेल्वेने आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आपल्या कामगारांना होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे। कोरोनाचे आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीने माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या […]

YOU MAY LIKE ..