कोरोनाविरोधात जंग :रेल्वेत आर्सेनिक अल्बम 30
गोळ्यांचे वाटप सुरू!
*****************
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मध्य रेल्वेने आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आपल्या कामगारांना होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे। कोरोनाचे आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीने माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या गोळ्या उपयुक्त आहेत,असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे। त्या पार्श्वभूमीवर, त्या गोळ्यांचे कामगारांना वाटप करण्याबाबत रेल्वेने काढलेले हे परिपत्रक। मध्य रेल्वेत भायखळा, कल्याण, भुसावळ, पुणे,नागपूर, सोलापूर अशा सहा ठिकाणी होमिओपॅथीच्या डिस्पेन्सरीज आहेत।