Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
माजी पोलीस उपायुक्ताला खायला उठणारा लॉककडाऊनचा बंदीवास!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
इथे पोस्ट केलेला पुष्पगुच्छासोबतचा फोटो आहे माधुरी सुरेश जाधव यांचा. माजी पोलीस उपायुक्त Suresh Jadhav यांच्या पत्नी.साधारण सहा महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने त्यांचे अकाली निधन झाले.त्यांचा उत्सवी फोटो 20 मे रोजी त्यांच्या जन्म दिनी फेसबुकवर टाकून जाधवसाहेब यांनी आपल्या पत्नीच्या आठवणींना उजाळा दिला. पण त्या फोटोवर काही ‘ कॉमेंट’ टाकण्याचे माझे धाडस झाले नाही. माधुरी जाधव याही सरकारी अधिकारी होत्या. रेशनिंग खात्यातून त्या निवृत्त झालेल्या. तर, जाधवसाहेब हे पोलीस दलातून.
सुरेश जाधव यांची आणि माझी मैत्री 1983 सालापासूनची. मला त्यांनी धाकटा भाऊ म्हणूनच प्रेम आणि त्यांच्या भावविश्वात कायमसाठी स्थान दिलेले आहे. तेव्हा मी दलित मुक्ती सेनेत कार्यरत होतो. माझ्या हस्ताक्षरावरील आणि लेखनशैलीवरील त्यांच्या प्रेमाचे रूपांतर आमच्या मैत्रीत झालेले. ते प्रेम आणि मैत्रीनेच त्यांना दोन वर्षांपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मला प्रदान करण्याच्या समारंभाला खेचून आणले होते. अन त्यानंतर माझ्या कन्येच्या लग्नाची पत्रिका मी आणि माझी पत्नी sunanda shejwalkar हिने माधुरी सुरेश जाधव यांना अंधेरीच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक दिली होती. त्यानुसार, त्या दोघांनी लग्नसोहळ्यात येऊन वधू वरांना आशीर्वाद दिले होते.आता माधुरी जाधव या आपल्यात नाहीत. त्यांच्या जन्म दिनी जाधवसाहेब यांनी पोस्ट केलेला फोटो पाहून गहिवरून आले. कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊनचा सक्तीचा बंदिवास जाधवसाहेब एकाकी कसा कंठत असतील, या प्रश्नाने अस्वस्थ करून सोडले. त्यांच्या पत्नीच्या फोटोवर कसे व्यक्त व्हावे, हे उमगलेच नाही.
माधुरी जाधव या ऑफिसला गेलेल्या असतांना त्यावेळी अंधेरी येथे साईड ब्रांचला नेमणूक असलेल्या जाधवसाहेबांची माझी भेट व्हायची. मोकळीक असल्याने ‘आपण घरी जाऊन ऑम्लेट बनवून खाऊ या काय?’असा प्रस्ताव जाधवसाहेब माझ्यापुढे ठेवायचे. माझ्या कन्येची लग्नपत्रिका हाती देतांना ते किस्से जाधव मॅडम यांना मी ऐकवले. तेव्हा ‘होय ते खरे आहे. आपल्या साहेबांना ऑम्लेटशिवाय काहीच बनवता येत नाही’ असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांचे ते विधान आजच्या लॉक डाऊनच्या काळात जाधवसाहेब यांचे पत्नीवियोगाचे दुःख गहिरे आणि गडद करून टाकते.
Rpi Athawale यांची गोष्ट
********************
1988-89 सालची ही गोष्ट. सुरेश जाधव हे त्यावेळी अंधेरी स्टेशनसमोरच्या आगरकर चौकातील पोलीस क्वारटर्समध्ये राहायचे. त्या काळात मरोळ भागात काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक भगवंतराव पाटील हे बडे प्रस्थ होते. आपल्या साम्राज्याला धक्का लागू नये म्हणून त्या भागात भारतीय दलित पँथरची छावणी स्थापन होण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ते सर्वशक्तीनिशी प्रयत्न करायचे. तशा परिस्थितीत माझ्या संप्रकातील Damodhar Bodke, अशोक सावन्त यांनी पँथरची छावणी स्थापन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला. पण नगरसेवक पाटील यांच्या अडथळ्यांमुळे पँथर नेते रामदास आठवले यांच्या सभेसाठी स्टेज लावणेही मुश्किल झाले होते. तरीही आठवले यांनी छावणी फलकाचे उद्घाटन करून कशीबशी तिथे सभा पार पाडलीच. त्यानंतर रात्री उशिरा आमचा ताफा रिक्षा, बसमधून उपाशी तपाशी अंधेरी स्टेशनजवळ पोहोचला.
इथे माझे मित्र सुरेश जाधव राहतात, असे सांगून आठवले यांना मी बस स्टॉप जवळ थांबवले. अन जाधवसाहेब यांना घरातून बाहेर घेऊन आलो. मग आठवले यांच्यासहित आम्हा पँथर्सना त्यांनी समोरच्या इराणी हॉटेलातून चहा बिसकेट्स चारली. तसेच पुढे मुंबईच्या दिशेने निघायला टॅक्सी, रिक्षा, ट्रेन भाड्यासाठी पैसे देऊन जाधवसाहेब यांनी आमचा निरोप घेतला होता.
इंडिसेंट प्रपोजल ?
**************
‘इंडिसेंट प्रपोजल’ या नावाचा एक गाजलेला इंग्रजी सिनेमा आहे. तो इथे आठवायला कारणही तसेच आहे. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत मी लहानांचा मोठा झालो. 1988 पर्यंत माझे वास्तव्य तिथे होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वांद्र्याच्या सिद्धार्थ कॉलनीत माझे मित्र रतनकुमार ठेंगे ( त्यांचा पुत्र Harshak Thenge (Raj) ) हा आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे.) यांच्याकडे आश्रय घेतला होता. पण तिथे मी राहत असलेल्या झोपडीचे महापालिकेने डीमॉलिशन केल्याने बेघर व्हावे लागले होते. ( डीमॉलिशन स्क्वाडमध्ये पालिका सेवेत असलेले दलित मुक्ती सेनेचे वडाळा येथील काही भीमसैनिकच होते आणि माझ्या पत्नीशी परिचित होते! हा योगायोग मनाला डागण्या देणारा ठरला होता. त्याची कथा वेगळी आहे.) विशेष म्हणजे, त्याचवेळी मला सेंटॉर हॉटेलमधील नोकरीही गमवावी लागली होती. त्या कालखंडात वर्षाचे बाराही महिने चालणाऱ्या नामांतर आंदोलनातील ‘बेभान’ सहभाग आणि नोकरीला दांड्यामुळे ती कारवाई अर्थातच मी स्वतःहून ओढवून घेतली होती.
त्या परिस्थितीत जाधवसाहेब यांना रमाबाई कॉलनी सोडण्याचा माझा निर्णय रचलेला नव्हता. कारण 1983 सालात आमची भेट झाली, तेव्हाच त्यांनी महानगर पालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने ‘तयारी’ करण्याचा आग्रही सल्ला दिला होता. ‘ मटका किंग’ रतन खत्री अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेला. जाधवसाहेब यांनी माझे वास्तव्य रमाबाई कॉलनीत असतांनाच कुठे तरी बंद पडलेली एखादी ‘बिटिंग’ चालवायला घ्यायला तुला काय हरकत आहे,असे मला सुचवू पाहिले होते. पण त्यांना मी प्रतिसाद काही दिला नव्हता. मला ते इंडिसेंट प्रपोजल वाटले होते.
चळवळींनंतर पत्रकारितेकडे वळल्यावरही माझ्या जीवनात अनेक स्थित्यंतरे, स्थलांतरे आणि अस्थिरतेचे फेरे आले. त्यात साक्षीदार आणि माझे मदतगार बनलेल्या जाधवसाहेब यांना ‘नीतीमत्ता, नैतिकता आणि साधनशुचितेने मला काय दिले,’असा प्रश्न माझ्याशी भेट झाल्यावर नेहमीच पडत असतो.
●●●●●●●●●●●●●●●●●●●