राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!…!

राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!.-
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com

राज ठाकरे यांनी एकट्यानेच ‘नो ब्यालट पेपर, नो इलेक्शन’ अशी भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या समोर ठेवला होता। तो मान्य केला असता तर त्या पवित्र्याचे जगभरात पडसाद उमटून केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला असता।पण मुळात नितीधैर्यातच खोट असल्याने बाकीचे पक्ष लगेच गळपटले। ईव्हीएमवरच निवडणुकीला सामोरे जाण्याची आत्मघातकी भूमिका त्यांनी घेतली। असे पक्ष निवडणुकीनन्तर संसद आणि विधिमंडळात लाजिरवण्या संख्याबळामुळे विरोधी पक्ष नेते पदालाही मोताद होत असतील तर त्यात नवल ते काय?

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्तेची संधी मागण्याऐवजी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपल्या पक्षाला संधी द्यावी,असेच आवाहन प्रत्येक सभेतून राज्यातील जनतेला केले। राज ठाकरे यांचे ते आवाहन म्हणजे राज्यात ‘ मी परत येईन’ फेम मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप – शिवसेना महायुतीचेच सरकार पुन्हा येणार, हे मान्य करणारे होते। शिवाय, मनसेला सत्तेची संधी नाही, याची कबुली त्या आवाहनात दडलेली होती। त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या चर्चेत त्यांच्या त्या आवाहनाची खिल्ली उडवली गेली।

पण राज ठाकरे यांनी ईव्हीएममुळे सगळ्यांनीच गृहीत धरलेला निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय वास्तव लक्षात घेऊन प्रबळ विरोधी पक्ष म्हणून संधी मनसेसाठी संधी मागणे गुन्हा आहे काय?

गेल्या पाच वर्षात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांचे नेते म्हणून काय कामगिरी केली ? जनतेच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी राज्यात फिरून रान उठवले? उलट विरोधी पक्षाची ‘स्पेस’ तर शिवसेनेनेच सरकारमध्ये असतानाही पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही धारेवर धरत खाऊन टाकली होती। विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष बेदखल झाले होते।

आता या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कोसळधार पावसात केलेल्या प्रचार सभेची कौतुकमिश्रित भरपूर चर्चा झाली। पवार यांचे वयोमान आणि आजही त्यांच्यात असलेली ऊर्जा पाहता ते स्वाभाविकही होते।

पण त्याच पवारांनी काँग्रेसमध्ये परतण्यापूर्वी एकेकाळी ‘ समाजवादी काँग्रेस’ हा आपला पक्ष वाढवत तब्बल आठ वर्षे विरोधी पक्ष नेता म्हणून खर्ची घातली होती। ती धमक, चिकाटी, आत्मविश्वास त्यांच्याकडुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही नेते कधी शिकणार ?

Next Post

थोतलाकोंडा स्तुपाची पावसामुळे पडझड

शनी ऑक्टोबर 26 , 2019
थोतलाकोंडा स्तुपाची पावसामुळे पडझड ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ […]

YOU MAY LIKE ..