भंडार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय?
नुकताच भंडार्याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय लोकशाही देवून भारताची आधुनिक निर्मिती केली त्या महामानवाला लोकशाहीतील आकडेवारीच्या पोकळ कंडाळ्याकरून तत्कालीन काॅग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला.त्या इतिहासाला कायमच आंबेडकरी कार्यकर्ता मनात सल ठेवुन आहे. नाना पाटोळे यांच्या राजीनाम्याने
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा काढावा अशी संधी आंबेडकरी समुहाला मिळाली आहे त्याचा पुरेपुर वापर करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा काढावा
सा संदेश मतदारसंघातील तरुणांना दिला जात आहे.
हिंदू कोड बिलाचा आग्रह , ओबीसीसाठी राखीव जागा याचा आग्रह केल्यामुळे सवर्ण हिंदु हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांवर अगोदर नाराज होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसच्या नारायण कोजरोळकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडुन पराभव पत्करावा लागला होता.
पुढे याचा १९५४ च्या भंडारा पोटनिवडणुकीत बाबासाहेबांना यांना बसला आणि दुसऱ्यादा निवडणुकीत त्याना पराभव सहन करावा लागला .
आतापर्यंत भाजपाकडुन कोणताही उमेदवार अजुन निश्चित झालेला नसुन शरद पवारांच्या राष्टवादी काॅग्रेस तर्फे संभाव्य उमेदवार म्हणुन प्रफुल पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे .
जर ते उभे राहीले तर त्यांना निवडुन न देण्याचे आव्हाण भारिपचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे त्या प्रकारची समिकरणे व तशी मोर्चेबांधनणी अॅड. बाळासाहेब आंबेडकर करित आहेत.
या मतदार संघातील चौदा लाख मतदारांपैकी साडे सहा लाख मतदार दलित, आदिवासी, मुस्लिम समाजातील आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण, अट्रोसिटीचे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण पाहता तरुणांमध्ये अन्यायाविरोधात चीड निर्माण झाली आहे, त्याचे पडसाद या पोटनिवडणुकीत उमटलेले दिसतील.
यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनामर्फत खास करुन तरुण मतदारांना जागृत करण्याचे काम सुरू आहे .त्याची मोर्चेबांधनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट प्रदेश अध्यक्ष महेश भारती यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली. भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया, गोरेगाव पवनी या ठिकाणी येत्या १३ते १६ एप्रिल दरम्यान ते दौऱ्यावर आहेत.