आंबेडकरी चळवळ आणि अनुयायांना बदनाम करण्याचा हा कुटील डाव तर नाही?

आंबेडकरी चळवळ आणि अनुयायांना बदनाम
करण्याचा हा कुटील डाव तर नाही?

तामिळनाडू मध्ये डॉ.बाब्बासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तलवारीचे घाव घालून तोडफोड केल्यानंतर समाजकंटक फरार झाले होते. तेथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला शोधून म्हणे तुकडे तुकडे केले असून, आमच्या नादाला जो लागेल त्याचे असेच हाल होतील असा इशारा देण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशलमिडियावर आंबेडकरी समाज विध्वंसक असल्याचा प्रचार करण्याचा जातीवादी मानसिकतेचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजकंटकाची हत्या झाली असती तर वृत्तसंस्थेद्वारे ही घटना जनतेपुढे आली असती. त्याची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये झळकली असती. अधिकृत असा कोणताही पुरावा नसताना, सोशलमिडियावर ही बातमी कशी झळकली? याचाच अर्थ असा की, आंबेडकरवादी जनता खून का बदला खून असा घेत असून, तथागत गैतम बुद्धांच्या अहिंसा व मानवतावादी विचारांचा मुडदा पाडण्याचे काम करीत आहे हा संदेश समाजात पोहचविण्याची आयती संधी मिळाली.

पोलिसांनी या घटनेचा कोणताही खुलासा केलेला नाही हेही आपण लक्षात घ्यावयास हवे.

या घटनेनंतर संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ” जो कोणी हिंदू धर्माच्या विरोधात बोलेल त्याची अवस्था अशीच होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. मग फुले, शाहु, आंबेडकर असो की, पेरियार प्रत्येकाचे मडदे पडतील ” असा सूचक इशारा दिलेली ही पोस्टही आंबेड्करी जनतेला भडकावून देणारी आहे.त्यची पोस्ट व्हायरल झाली असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोहन भागवतांविरोधात प्रचंड टिका केल्या आहेत.
“डॉ.बाबासाहेबांविरोधात टीका सोडाच, पण गरळ ओकताना भागवत महाशयांना दहा वेळा विचार करावा लागेल. संघाची कर्मठता सर्वानाच ज्ञात असली तरी संघीष्ठ इतकी टोकाची भूमिका घेणे शक्य नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतांना संघ उपद्रवमूल्ये निर्माण करून भाजप या राजकीय शाखेपुढे अडचण निर्माण करेल याबाबत शंका वाटते. म्हणूनच समाजात विद्वेष पसरविण्याचे काम ज्या कोणी शक्ती करत असतील, त्यांचा विशेष पथकाने शंध घेऊन सत्य चव्हाट्यावर आणावे ही आमची मागणी आहे. आंबेडकरी जनतेचा राजकीयप्रणलीवर विश्वास नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर जेथे बहुजनवाद्यांना एकमेकांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो तेथे, सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्यास फारसा वेळ लागणार नाही. सीबीआय पथकाने निरपेक्ष वृत्तीने रेशिमबागेपासून देशभरात जेथे जेथे धर्मांध प्रवृत्ती कार्यरत आहेत, तेथे छापे टाकून सत्य उजेडात आणावे असे आवाहन करीत आहोत. राजकीय, सामाजिक स्तर कमकुवत करण्याचे हे षडयंत्र असून, आंबेडकरी जनतेने आपला तोल ढासळू देता कामा नये. सत्य कितीही झकण्याचा प्रयत्त केला तरी
ते उजेडात येणारच आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
******
गुणाजी काजिर्डेकर,
चेंबूर, मुंबई,
गुरुवार, दि.२९ आॅगस्ट२०१९

Next Post

तब्बल तीन दशकानंतर मिळाला न्याय,बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली..!

शुक्र ऑगस्ट 30 , 2019
तब्बल तीन दशकानंतर मिळाला न्याय,बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली!-दिवाकर शेजवळ मुंबई ,दि 28 ऑगस्ट: राज्यातील भाजप -शिवसेना महायुतीच्या सरकारने ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील ऑन लाईन अर्ज प्रणालीत बौद्ध समाजाला अपेक्षित सुधारणा नुकतीच केली आहे. त्यामुळे जातीच्या प्रमाणपत्राबाबत गेली तब्बल 30 वर्षे […]

YOU MAY LIKE ..