बुद्ध तत्वज्ञानामुळे जग युध्दापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल.- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बुद्ध तत्वज्ञानामुळे जग युध्दापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल.- डॉ बाबासाहेब आंबेडकर

दि १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री मूर्ती व त्यांच्या पत्नी यांचा श्री राजभोज यांनी सत्कार केला. या सत्काराला पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर,आद.माईसाहेब आंबेडकर ,रोहिणीकुमार
चौधरी,ज.भोसले,आमदार कृष्णा व इतर पंधरा -वीस आमदार हजर होते .या प्रसंगी बाबासाहेब यांनी अत्यंत छोटे पण अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक असे भाषण दिले.

“जगापुढे विशेषत: आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही .तर कम्युनिस्ट तत्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे.बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युध्दापासून दूर व शांततेच्या नजिक जाईल.”

अत्यंत दूरदृष्टीने मांडलेले हे विचार यातील सत्यता आपणास सोव्हिएत रशियाची झालेली विभागणी आपण पाहिली.

आज ही भारत देशात धार्मिक गुलामी लादली जात आहे लोक धार्मिक भावना एकमेकांच्या दुखावत आहेत. माणूस म्हणून एक समान समाज निर्माण करायचा असेल तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर सांगितल्याप्रमाणे जगाला बुद्धाची गरज आहे.जेवढ्या लवकर हे समजून घेतले जाईल तेवढे जग युद्धाच्या पासून दूर जाईल .

संदर्भ :डॉ बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्मावरील भाषणे
संकलन-संपादक -निरंजन पाटील
प्रकाशक : प्रज्ञा-बोधी साहित्य प्रकाशन,कल्याण

शब्दांकन –
प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Next Post

"थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या...!".

शुक्र एप्रिल 24 , 2020
“थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या…!”. ***************************** सूरज रतन जगताप-www.ambedkaree.com प्रत्येक लेणी आपले स्वतःचे एक वैशिष्ट्ये जपून आहे, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या हजारो लेण्यांचा आपण वारंवार उल्लेख करतो. प्रत्येक लेणी तसे आपले एक वैशिष्ट्य जपून आहे पण त्यातल्या त्याल दोन लेण्यांकडे आपले […]

YOU MAY LIKE ..