दलित पँथरचा महानायक:राजा ढाले-दिवाकर शेजवळ,जेष्ठ पत्रकार
‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक kraanti होऊ शकली नाही,’असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते। पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो। दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या। त्यामुळे आपल्या देशात व्होल्टेअर जन्माला येऊ शकला नाही!
वणवा पेटवणारा तिसरा
निखारा विझला
त्या ऐतिहासिक पँथर वणव्याला फैलावणारे धगधगते पाच निखारे होते: राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वि पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर.
भाई संगारे, नामदेव ढसाळ यांच्यानंतर राजा ढाले यांच्या निर्वाणाने तिसरा निखारा विझला आहे।राजाभाऊंना अखेरचा सॅल्युट आणि विनम्र श्रद्धांजली।