आंबेडकरी जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची नवी इनिंग: महाराष्ट्र माझा .

जेष्ठ पत्रकार मा दिवाकर शेजवळ यांची ‘नवी इनिंग’- महाराष्ट्र माझा


प्रवीण बरदापुरकर दैनिक ‘लोकसत्ता’ च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक. राजकीय ‘बातमीदारी’ ने राजधानी दिल्ली गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र माझा’ या नवीन राजकीय साप्ताहिकाचे राज्यात पुढील महिन्यात आगमन होत आहे. त्यात राजकीय लिखाणासाठी बरदापुरकर यांनी त्यांच्या टीममध्ये आंबेडकरी जेष्ठ पत्रकार मा दिवाकर शेजवळ यांची राजकीय विश्लेषक अन राजकीय घडामोडी वर सडेतोड लिहिण्यासाठी निवड केली आहे.

महानगर, आज दिनांक, सांज दिनांक ही सायंदैनिके, साप्ताहिक चित्रलेखा, देशोन्नती, लोकनायक आणि सामना या वृत्तपत्रांतील तीन दशकांच्या पत्रकारितेनंतर शेजवळ यांची आता ‘नवी इनिंग’ महाराष्ट्र माझा या साप्ताहिकातून सुरू होत आहे.


हे साप्ताहिक देशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट एक्प्रेस’ नावाचे साप्ताहिक प्रकाशित करणार्‍या नवी दिल्लीच्या राव मिडिया ऑर्गनायझेशनतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी www.ambedkaree.com ला दिली.

केवळ राजकारणाचाच वेध नव्हे तर समाजकारण,अर्थकारण,शिक्षण,उद्योग,भाषा,
सांस्कृतिक-साहित्य,कला,संगीत इत्यादी क्षेत्रातील’राजकारण ‘उलगडून सांगणारे‘महाराष्ट्र माझा’हे अशा प्रकारचे कदाचित मराठीतील पहिलेच साप्ताहिक असेल .

कोणतीही एकारली कर्कश्श भूमिका न घेता , आक्रमकता म्हणजे आताततायीपणा वा आक्रस्ताळेपणा नाही याचे नेमके भान राखून नि:पक्षपाती व विवेकी वृत्तीने समाजाच्या सर्वच क्षेत्रातील राजकारणाचा वेध घेणारा मजकूर‘महाराष्ट्र माझा’त समाविष्ट करण्याची भूमिका संपादक बरदापुरकर यांची आहे . या साप्ताहिकाचे प्रकाशन पुण्यातून केले जाणार असून त्याचे राज्यभर वितरण होणार आहे.

चला आता या नव्या साप्ताहिकाच्या आगमनाची तूर्तास वाट पाहु व www.ambedkaree.com कडून दिवाकर शेजवळ सरांना त्यांच्या या नव्या जबाबदारी करीत मंगलमय शुभेच्छा देत आहोत.

थोडक्यात- मा दिवाकर शेजवळ हे www.ambedkaree.com चे संपादकीय सल्लागार असून ते www.ambedkaree.com च्या निर्मिती पासूनच मार्गदर्शन करीत असतात व त्यांचे विविध लेख www.ambedkaree.com वर प्रकाशित होतात.

-प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkree.com

Next Post

आम्ही असे का वागतो?

सोम जुलै 22 , 2019
एक अनुत्तरित मंथन: आम्ही असे का वागतो?- गुणाजी काजीर्डेकर पॅथर राजा ढाले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आणि चैत्यभूमीवर त्यांचे पार्थिव आणल्यानंतर झालेली गर्दी चीड आणणारी होती. राजा ढालेंच्या निधनानंतर सोशल मिडियावर लेखण्या नव्हे तर तलवारी उपसल्या गेल्या. ढालेंच्या जाण्याने समाज दिग्मुढ झाला […]

YOU MAY LIKE ..