सुगंधाई फाऊंडेशन,दान मैत्री आणि जय भारत यु ट्यूब चायनेल च्या व्दारा जागतिक बुद्ध पौर्णिमेला बुद्ध -भीम डिजिटल जयंतीचे ऑनलाईन आयोजन !
गेल्या काही वर्षापासून सुगंधाई फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी सेवा भावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांना मानांकित करून त्यांना सन्मानित करण्याचे कार्य करीत आहे .विविध आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. “धम्मचक्र” संगीत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध गायक ,संगीत ,लेखक,कवी,नाट्य -चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना हक्काचे स्थान मिळवून दिले आहे.याच कलाकारांना घेऊन प्रतिवर्षी धम्मचक्र विविध बहुरंगी कार्यक्रम सादर करीत असतात .
सध्या कारोना काळात एकत्र येऊन कोणत्याही सामाजिक कार्यात भाग घेता येत नाही व आपली कला सादर ही करता येत नाहीय .कित्येक कलाकार आज आर्थिक संकटात आहेत . मात्र यावर्षी सुगंधाई फाऊंडेशने जय भारत या YOUTUBE चायनेल च्या सहकार्यने विश्व उद्धारक तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डिजिटल च्या माध्यमातून ONLINE LIVE संगीतमय जयंतीमहोत्सव साजरा होत आहे त्यात विविध कलाकार आपल्या कला YOUTUBE च्या माध्यमातून सादर करणार आहेत.
आपणास कार्यक्रम बघण्यासाठी लिंक साठी सुगंधाई फाऊंडेशनच्या राजेश जी खैरे यांकडे संपर्क करावा +91 72084 00987 असे सुगंधाई फाऊंडेशनच्या वतीने www.ambedkaree.com ला कळविण्यात आले आहे.