खाकी वर्दीतला देव….!

खाकी वर्दीतला देव
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
धनश्री सुगावकर -वागरे,
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

“देशात आणि जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे .डॉक्टर,नर्स,पॅरामेडिकल स्टाफ,हॉस्पिटलमधील इतर कामगार,सफाई कर्मचारी,पोलीस,वीज कर्मचारी,रेल्वे,एसटी ,आणि अत्यावश्यक सेवा देणारे सर्व कामगार आणि वरिष्ट सर्वजण आपला जिवमुठीत घेऊन कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत. पोलीस म्हटले की लोक नाक मुरडायचे आता अहोरात्र सेवेत असणाऱ्या पोलीस दल जनतेला देवा सारख वाटत आहे .देव आणि दैवीशक्तीवर विश्वास ठेवणार इथला समाज पोलिसांकडे ही आपला देव म्हणूनच पहात आहे त्या पोलीसरुपी देवाच्या पत्नीला आपल्या नवऱ्याची काळजी आई ,मुलाला आपल्या वडिलांची काळजी आहे असाच एका पोलीस पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्यात”

काल सकाळी विवान त्याच्या पप्पाना कॉल कर म्हणून हट्ट करत होता ,म्हणून मी त्यांना कॉल केला ,तर विवान त्याच्या पप्पाना म्हणतो की, पप्पा तुम्ही कुठे आहे, आपल्या भारत देशात कोरोना व्हlयरस आला आहे, तुम्ही मास्क लावले का?हात पाय धूत राहा, मला विवान च खुप नवल वाटलं.

आमचा विवान चार वर्षांचा आहे.त्याला इतकं कस समजलं असेल, की आपल्या पप्पाना कॉल करून हे सर्व बोलावे.विवानचे पप्पा प्रसाद वागरे मुंबई येथे पोलीस सहाय्यक निरीक्षक(APl)आहेत.सध्या कोरोना या रोगाने भारतात थैमान घातले असून याचे सर्वात जास्त रुग्ण हे मुंबई येथे आहेत.

जनतेला सांगून सुध्दा गर्दी करत आहेत.घराबाहेर निघत आहेत. मास्क घालत नाही. पोलिसांच्या सुचनेच पालन करून त्यांना साथ दिली पाहिजे. पोलीस पण माणूस आहे.आज प्रत्येक माणूस घरात आहे पण पोलीस भूक, तहान, कुटुंब हे सर्व विसरून रस्त्यावर ऊभे राहून आपल्या देशाची सेवा करतो आहे.मी प्रसादला कॉल केला की,आज मी येथे बंदोबस्ताला आहे आज मी इथे बंदोबस्ताला आहे असे सांगतात.रोज असा एक पण दिवस जात नाही की प्रसाद कसे असतील,सुरक्षित ठिकाणी असतील ना, जेवण करत असतील ना, असे अनेक प्रश्न मनात येतात आणि मनाची बेचैनी सुरु होते. खूप काळजी वाटते हो तुमची.


‘वर्दीतला देव’ही उपमा पोलिसांना दिलेली आहे, तरी जनतेला हे समजायला पाहिजे की, पोलीस पण हा माणूस आहे त्यांना माणुसकीच्या नात्याने साथ दिली पाहिजे,त्यांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे,कारण त्यांनी रस्त्यावर आहेत म्हणून आपण घरात सुरक्षित आहोत.
अभिमान वाटतो पोलीस पत्नी म्हणून घ्यायचा
तुम्ही पण घ्या काळजी स्वतः ची
तुम्ही रस्त्यावर आहात म्हणून तर
आम्ही घरात सुरक्षित आहोत
आम्ही आहे घरात बसून
पण तुम्ही उन्हात उभे राहून
आपले कर्तव्यपार पाडता
म्हणून म्हणते अभिमान वाटतो पोलीस पत्नी म्हणून घ्यायचा
रस्त्यावर कोणी पोलीस दिसले
तर त्यांना पाणी, नास्ता विचारा
तुमच्या सुरक्षतेसाठी तो रस्त्यावर राहतो
त्यामुळे त्यांचा विचार करा
म्हणून म्हणते अभिमान वाटतो पोलीस पत्नी म्हणून घ्यायचा.

-धनश्री सुगावकर -वागरे,9096004597,मुंबई.

Next Post

सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित.

गुरू मे 14 , 2020
सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ निलेश नादावडेकर-www.ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ देशात सर्व राज्यात कोरोनाच्या भितीमुळे असंघटीत कष्टकरी कामगार शहरे सोडून गांवाकडे पायी चालत निघाला असतांना त्याला कोणीच हिंदू लोक, हिंदू कामगार, हिंदू मजदूर म्हणत नाही.कारण हे सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक […]

YOU MAY LIKE ..