दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने……!

2

दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार’१५ जुलै रोजी   वयाची ७५ वर्ष पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्त ..

निष्टा म्हणजे  काय? आंबेडकरवादी म्हणजे  काय? हे आपल्या कृतिशील जगण्यातून आदरणीय ठरलेले ज.वि.पवार आंबेडकरी चळवळीतील एक आदराचे स्थान आहे .भाऊसाहेब ,दादासाहेब ,मामासाहेब  असली कोणतीच बिरूद न मिरवता ते आंबेडकरी चळवळीत परिचयाचे आहेत ते जवि.या नावानेअसलेला हा छोटा  सैनिक पुढे समता  सैनिक दलाची मानवंदना स्विकारणारा सैनिक ठरला.१९६९ साली  विघटीत रिपब्लिकन पक्षावर”बलिदान” कादंबरी लिहिणारा  ठरला ,दलित पॅंथर सारखे लढाऊ चळवळ उभारून आंबेडकरी जनतेचा संरक्षक ठरला .

आपल्या लेखनाची सुरुवात डॅा.बाबासाहेब आंबेडकर अशा शब्द समुच्चयाने करून एका  आठवड्यात वर्तमानपत्रात ५/६ स्तंभ लिहिणे केवळ जविच करू शकतात.अजातशत्रु असलेले जवि.सच्चे आंबेडकरवादी आहेत .ते जसे  चळवळ आहेत तसेच ते चळचळीचे भाष्यकार आहेत .त्यांचा “आंबेडकराेत्तर आंबेडकरी चळवळ” हा प्रकल्प त्याची साक्ष देणारा आहे .

बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त आंबेडकरी विचार शिल्पे आकाराला यावीत म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाना ग्रंथनिर्मिती करण्यासाठी पत्रव्यवहार केला  परिणामी  डॅा.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यानी ग्रंथ निर्मिती केली.

जवि म्हणजे निस्वार्थी कार्यकर्ता ,बेडरपणा,वेचारिक निष्ठा,कृतिशील कार्यप्रवणता,निर्व्याज मैत्री,विरोधकाना समजून घेणे.साहित्याच्या माध्यमातून माणसाची सांस्कृतिक मशागत करणे,वंचिताना न्याय मिळवण्याकरता लढणे,न्यायासाठी रस्त्यावरच्या लढाया करणे या सर्वाचा एकत्रित अर्थ सामावलेला आहे  तो जवि.या नावात.

१ आॅक्टोबर १९५८च्या समता  सैनिक दलाच्या परेडमध्ये मास मुव्हमेंट,सम्यक क्रांती सारख्या सामाजिक संस्था उभारून राज्यक्रांतीपेक्षा समाजक्रातीला अग्रक्रम देणारा विचारवंत ठरला.बाबासाहेबांची बदनामी करणारे अनेक प्रवृत्ती जन्माला आल्या.कधी बाबासाहेबांवरील मालिका तर कधी दुर्गाबाई  भागवत .या बदनामी विरुद्ध कोर्टाचे दरवाजे ठाेठावून त्याना चीत करणारे ठरले.त्याच जवि पवार यानी चैत्यभूमीवर ग्रंथमेळावे सुरूकरून नवे पायंडे  टाकले .
बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य कोर्टरिसिव्हरच्या पेटाऱ्यात बंदीस्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाला ते साहित्य प्रकाशित करण्यास भाग पाडण्यात जविंचा वाटा मोठा आहे .

जविंचे पंच्याहत्तरीत प्रवेश करीत असताना आजही  ते रस्त्याने चालताना  दिसतात जमिनीशी प्रतारणा न करता हा अनेकांचा मित्र नेत सगळ्याचेच आदर्श आहेत . ज.वि.दलितांच्या पाहिल्या पिढीतील लेखक आता आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून परिचित आहेत .संपादन ,चरित्र ,कादंबरी ,संशाेधन,निबंध हे सगळे प्रकार त्यानी लिलया पेलले आहेत .पत्रकार,कार्यकर्ते,अभ्यासक याना ते नेहमी मार्गदर्शन करत असतात.एकाच वेळी विविध क्षेत्रांतील वावर आश्चर्यकारक आहे .
त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य आणि त्यांची पुढील वाटचाल अधिकाधिक प्रेरणादायी होवो….!
– संजय कोचरेकर
सल्लागार संपादक
www.ambedkaree. com

2 thoughts on “दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने……!

  1. सन्मानिय ज.वि . सरांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा – देवा पवार

Comments are closed.

Next Post

ज वि पवार .…....! आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी तेजस्वी अन स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व....!

रवि जुलै 15 , 2018
ज वि पवार .…….! आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी तेजस्वी अन स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व….! माझ्या शालेय अभ्यासक्रमात दहावीच्या मराठी पुस्तकात तील ती कविता- तू झालास मुकसमाजाचा नायक.…….! कधी स्वप्नातही त्या वेळी वाटले नव्हते की या कवितेच्या कवींना मी भेटेन ….! ज्या दिवशी ही कविता […]

YOU MAY LIKE ..