Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…!
गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील नांदेड गावात (जि. चंद्रपूर) उपेक्षेच्या अंधार्या कोपर्यात आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करत आहेत व परिस्थितीशी झगडत आहेत त्यांना हवाय मदतीचा हात.आपल्या इच्छा शक्ती आणि प्रामाणिक पणे केलेले सामान्यातुन असामान्य काम …असे शेतीविषयातील दिपस्तंभ म्हणजे खोब्रागडेची गाथा आंबेडकरी समाजाला अभिमानास्पद अशीच आहे .
फोर्ब्ससारख्या जागतीक मॅगझिनने त्यावेळी दादाजी खोब्रागडे यांच्या तांदुळ संशोधनाची दखल घेतली होती.
अर्धांगवायूने क्षीण शरीर या व्यथांचा सामना दादाजी करत असतांना सरकारकडून उपेक्षा, समाजाकडून ही विस्मरण होत आहे
संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावणार्या दादाजी खोब्रागडे यांचे जेमतेन तिसरीपर्यंत शिक्षण झालेले असुन दादाजींची आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
1989 साली एचमटी सारख्या मोलाच्या बियानाची निर्मिती करणार्या व तांदळाच्या बारिक व खाण्यास चवदार असणार्या तांदळाचा शौध लावणार्या आंबेडकरी कृषीतज्ञांची फोब्सने जगातल्या २०१० मध्ये प्रकाशित केलेल्या यादित त्यांचे जगातले सर्वौत्तम ग्रामिण उद्यौजक म्हणुन मानाचे स्थान दिले .
त्यांना भारतीय मिडियाने आपली सावत्र भुमिका बाजुला घेत त्यांची दखल घेतली .
5 जानेवारी, 2005 रोजी अहमदाबाद येथे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 50 हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा भारत सरकार तर्फे गौरव करण्यात आला. तर 2006 मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
भारतीय समाजव्यवस्था, समाजमनात असणारा उपेक्षितपणा यात विस्मृतीत गेलेला हा महान संशोधक की ज्याने एचएमटीसारख्या मोलाच्या वाणाची निर्मिती केली त्या कृषी तज्ज्ञाचे कुटुंब मोलमजुरी करून आर्थिक विवंचनांची भगदाडे बुजवत आहेत. सरकार आणि समाजालाही आज या सच्चा संशोधकाची आठवण राहिलेली नाही.
अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग करुन 1989 साली त्यांनी अत्यंत बारीक आणि खाण्यास चवदार अशा एचएमटी तांदुळाचा शोध लावण्यात ते यशस्वी झाले आणि जागतिक कृषी जगताने त्यांची दखल घेतली .
देशाच्या राष्टपतीं दि. अब्दुल कलामांपासुन ते शरद पवारांसारखा कृषी मंत्री राहिलेल्या नेत्यांनी सन्मानित केलेली ही सामान्यातली असामान्य व्यक्ती परंतु मान-सन्मानांनी पोट भरत नाही या वास्तवाचा अनुभव दादाजींचे कुटुंबीय घेत आहेत.
शोधलेले वाण
एचएमटी, विजय नांदेड, नांदेड 92, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू हे नऊ
तांदुळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहेत.
अंथरुणाला खिळलेल्या या संशोधकाची उपेक्षा कधी संपणार? हा खरा प्रश्न आहे.
जगाणे दखल घेतलेल्या दादाजींना
त्यांच्या पहिल्या प्रयोगाची दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्राने घेतली. 1994 मध्ये एचएमटी हे वाण तज्ज्ञांनी अभ्यासासाठी घेतले. मात्र, चार वर्षांनी याच केंद्राने हे वाण पीकेव्ही या नावाने बाजारात आणले. या वाणात काहीच फरक नसल्याचे दादाजी सांगतात. अर्थात असे करुन डाॅ.पंजाबराव कृषी विद्यापीठाने ही त्यांना फसवण्याचा प्रकार केलाय.
त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक लोक श्रीमंत झाले; पण दादाजींची परिस्थिती आहे तशीच आहे. एक मुलगा, सून आणि 3 नातवंडे असा त्यांचा परिवार आजही मोलमजुरी करूनच जगतो आहे.
पुरस्कार आणि सत्कारांनी खूप आनंद मिळतो; परंतु सत्कार आणि पुरस्कारांनी पोट भरत नाही.मित्रजित खोब्रागडे दादाजींचा मुलगा म्हणतो आजपर्यंत बाबांना शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
या सगळ्या आज त्यांचे आजारपण आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे. आता बाबांच्या आजारपणात सरकारकडून थोडीफार मदत झाली तर बरेच होईल.
एका जागतीक दर्जाचा संशौधक असणारे उपेक्षित दादाजी खोब्रागडे. सरकार ,राजकारणी, शेतकरी आणि शेतीवर व शेतकर्यांवर सतत आपलीच मक्तेदारी असणार्या पुढार्यांच्या या महाराष्टात असामान्य व्यक्ती केवळ उपेक्षित पणे जीने जगत आहे .ज्या शेतकर्यांनी यांचे बियाणे वापरले आहे त्यात त्यांचा करौडोंचा फायदा ही झाला असेल. कृषी विद्यापीठासारखे ज्ञानपीठ ही अशा तज्ञांशी खोटे आणि फसवेगिरीने वागले हेच या देशाची संस्कृती . इथे वरच्या वर्णांना सतत डोक्यावर घेतले जाते मात्र कितीही योग्यता असुनही असामान्य व्यक्ती कशी निरागसपणे आपले जीवन मोठ्या कष्ठाणे जगत असते .
आंबेडकरी समाजाला भुषणाह असणारे दादाजी खोब्रागडे .यांच्यावर लिहावे असेबरेचदा वाटायचे पण योग्य माहिती येत नव्हती, मार्च मध्ये नव्यान www.ambedkaree.com सुरू करतांना आपल्यातील ह्या हिर्यांची मला आठवण झाली होती तसे मी मा. राजेंद्र गायकवाड यांच्याशी संवाद साधतांना बोललो ही होतो .अर्थात कृषीक्षेत्रावर येवढे मोठे कार्य असणारे दादाजी एवढ्या भयाणक परिस्थीतीत झगडत आहेत याची कल्पना नव्हती .
टीम www.ambedkaree.com च्या वतीन सर्वांना त्यांना मदतीचे आव्हाण करत आहोत .
प्रमोद रामचंद्र जाधव.
प्रमुख
-प्रस्तुत लेखकाने संदर्भ म्हणुन महाव्हाईस या वेब साइट वरिल बातमी घेतली आहे .