चिपळूण तालुका बौध्दजन हितकरणी समितीचे महामानवाना अभिवादन

चिपळूण येथे तालुका समितीचे अभिवादन

वर्तमान परिस्थितीत देशशतील सविधान वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत येत आहे ..याचे कारण राज्यकर्त्यांकडून सविधानांची योग्य अमलबजावणी होत नाहीय.यातूनच सविधानावर विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत .हे आपण थांबले पाहिजे .या साठीं संविधान प्रेमी जनतेने देशांच्या हितासाठी सविधानांचा रक्षणासाठी सज्ज असायला हवे .असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सरचिटणीस मा रोहित जाधव यांनी केले.

चिपळूण तालुका बौध्दजन हितरक्षक समिती चिपळूण आणि मुंबई यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात केले .

प्रकांड प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा पवित्र धातू कलश या प्रसंगी तालुक्यातील जनतेला अभिवादन करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आला होता.अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिपळूण तालुका बौध्दजन हितरक्षक संघाचे अध्यक्ष मा चंद्रकांत सावंत तर धम्म कमिटीचे अध्यक्ष मा अनन्त पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून होते.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी तालुका समितीच्या विविध कमिटीचे कार्यकर्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्थानिक वृत्तपत्र यांमध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आली असून सविस्तर माहिती साठी पहा .


-संदेश पवार

Next Post

भिमा कोरेगाव आरोपीला दिल्लीत पुरस्कार ??????

गुरू डिसेंबर 12 , 2019
भीमा कोरेगाव मुख्य आरोपीला दिल्लीत पुरस्कार ???? पुरस्कार करणारे कोण आहेत ? दलित वर्गासाठी भरीव काम केल्याने पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या बातमीत लिहिले आहे. दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघ नावाच्या संघटनेने पुरस्कार जाहीर केला आहे त्या संबंधित बातमी इंडियन एक्सप्रेस ने आपले […]

YOU MAY LIKE ..