चेंबूर लालडोंगर बलात्कार प्रकरण

चेंबूर लालडोंगर बलात्कार प्रकरण-

आंदोलनाच्या रेट्यापेक्षा नराधमांना वाचवणारा ‘दबाव’ निश्चितच मोठा आहे!
-दिवाकर शेजवळ

जालन्यातील एका तरुणीवर चेंबूरच्या लाल डोंगर येथे चार नराधमांनी केलेल्या बलात्काराला महिना उलटला। पीडित तरुणीचा अखेर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला। या प्रकरणात मुंबईत चुनाभट्टी पोलिसाविरोधात आंदोलन पेटले आहे।

या प्रकरणातील तक्रार औरंगाबाद पोलिसांनी चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केली आहे। मात्र ते पोलीस बलात्कारी नराधमांचा शोध न घेता ढिम्म बसून आहेत। त्यांच्याविरोधात भीम आर्मीसारख्या अनेक संघटना आणि राजकीय पक्षांचे मोर्चे त्या पोलीस ठाण्यावर धडकू लागले आहेत; आंदोलक पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन बलात्कारी नराधमांना अटक करण्याची मागणी करत आहेत। अन पोलीस मात्र आरोपींऐवजी आंदोलकांना कोठडीत डामबण्यात धन्यता मानत आहेत।असे चित्र मुंबई- महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे।

    गृह खाते अट्टाहासाने स्वतः कडे ठेवलेले मुखमंत्री महाजनांदेश यात्रेत मश्गुल आहेत। त्यामुळे चेंबूर लालडोंगर भागातील बलात्कार प्रकरणावरून आंदोलनातून व्यक्त होणारा जनाआक्रोश पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांनाही अदखलपात्र वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे। राज्यकर्ते आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे वर्तन असे असेल तर चुनाभट्टीचे पोलीस अधिकारी मस्तवाल आणि बेदरकार बनल्यास नवल नाही।

एक बलात्कार पीडित तरुणी जीवानिशी जाते। पण नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांच्या हाताला कापरे भरत आहे! त्यावरून त्या तरुणीला न्याय देण्यासाठो सुरू असलेल्या आंदोलनाच्या रेट्यापेक्षा चुनाभट्टी पोलिसांना गळपटवणारा ‘दबाव’ निश्चितच मोठा असला पाहिजे, एवढाच त्याचा अर्थ निघतो।

Next Post

स्त्री वर झालेल्या अत्याचार विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ती "स्त्री" आहे इतकं पुरेसे नाही का ??

शनी ऑगस्ट 31 , 2019
जेव्हा एखाद्या स्त्री वर बलात्कार होतो तेव्हा तिची जात किंवा धर्म कुठला आहे ,यावरून जर तिच्यावरिल अन्यायाचे मूल्यमापन ठरणार असेल, तर याचा अर्थ असा होतो की भारतीय समाज मन खुप “मागास” विचारांचा आहे… स्त्री ही मनुष्य आहे, ती कोणत्या कुळात जन्मलेली […]

YOU MAY LIKE ..