बा…!
पेटविलेस पाणी,
पेटविलेस रक्त,
पेटवीलेसअनैतिक
धर्मरुढींची विषवल्ली
धर्मग्रंथ…!
जाळलास या भुमीतला
विषम अन्यायकारक
अज्ञानी कुजकट
विचांरांचा गावगाडा,
असमान,हीनकस
अमानुष अर्थहीन
कोंडवाडे,
अनादीकाळाची
तोडुन बेडी,
दुबळ्या, गतगात्र
निर्विकार ,निशब्द
मनांना नवचेतना देत
साकारलीस नव
प्रकाश किरणे,
धर्ममार्तडांच्या विषवल्लीला
लाथ मारत,ठोकरलीस,
नाकारलीस अन
झिडकारलीस क्रृर
पिढ्यांनपिढ्यांची
गुलामगीरी अन्
घेवु दिलास
नव्या युगाचा
नवा श्वास, प्रबुद्ध
विज्ञानाचा, माणुसकीचा
समतेचा ,प्रगतीचा अन्
नवीन जगण्याची
अस्तित्वाची नवनिर्मितीची
प्रेरणा अखंडीत देणारा..
होय
आज इतिहासाच्या
पानापानात सोनेरी नोंद आहे
तुच मुक्त केलेस इथल्या स्रियांना,
धर्मचौकटीत बंद कडीकोट
गुलामांना अन उगारलीस
तुझी वज्र मुठ काळावर
धर्माच्या,वर्णाच्या अन् जातीच्या
नावावर भयगंड निर्मिणारा
मनु स्मृर्ती नामक भंपक
धर्मग्रंथाची राख केली अन्
मानवी स्वातंत्राचा घोष केला सर्वार्थाने..!
बा..!
विनम्र पणे
अभिवादन
करतोय..
नव्या श्वासाचे स्पंदने घेत..!
प्रमोद जाधव
www.ambedkaree.com