Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
हंडोरे लवकर बरे व्हा!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनावर मात करण्याची लढाई जिंकले आहेत. पण त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे दुर्दैवाने कोरोनाच्या पकडीत सापडले आहेत. त्यांच्या लागोपाठ दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आव्हाड आणि हंडोरे हे कोरोना महामारीच्या संकटात अगदी सुरुवातीपासून आपल्या प्राणाची पर्वा न करता स्थानिक जनतेच्या मदत कार्यात उतरले होते.अखेर त्या दोघांनाही कोरोनाला अंगावर घ्यावे लागले. आता हंडोरे यांनाही आव्हाड यांच्याप्रमाणे कोरानाला नामोहरम करण्यात जनतेच्या शुभेच्छा आणि दुवा कामी येईल, असा विश्वास वाटतोय.
चंद्रकांत हंडोरे हे आंबेडकरी चळवळीतील झुंजार पँथर आहेत. त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री अशी यशाची शिखरे अल्पावधीतच लीलया पादाक्रांत केली. पण सामान्य जनतेशी, आपल्या मतदारसंघाशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. ते सत्तेच्या कोणत्याही पदावर असोत,पण चेंबूरच्या पी एल लोखंडे मार्गावर पोलीस चौकीसमोर रोज सकाळी हंडोरे हे मशेरी लावत स्थानिक रहिवाशांशी संवाद साधतानाचे दृश्य गेली अनेक वर्षे दिसत आले आहे. मतदारांच्या संपर्कात न राहणाऱ्या नगरसेवक, आमदारांच्या बाबतीत ‘आपण यांना पाहिलेत काय?’ असा सवाल पूर्वी पोस्टर्सद्वारे आणि हल्ली सोशल मीडियावरून विचारला जाताना दिसतो.अशा काळात आपला मंत्री, आमदार, नगरसेवक सकाळी जाग आल्यानंतर तयार होण्याआधी मशेरी लावत लुंगीवरही आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी भरस्त्यावर आपल्यासाठी वेळ देतो, यापेक्षा आश्वासक आणि सुखावह चित्र झोपदीवासीयांसाठी कुठले असू शकते?
हंडोरे हे मंत्री असतानाच्या काळातही ते चित्र बदलले नव्हते. त्यांचा सरकारी बंगल्यातील मुक्काम आणि वास्तव्य हे तेथील बैठका आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कॅबिनेट मिटिंगपूरतेच असायचे. केंद्रीय मंत्री आणि बड्या नेत्यांच्या स्वागताचा विमानतळावरील शिष्टाचार पार पाडण्यासाठीही ते भल्या सकाळी पी एल लोखंडे मार्गावरील घरातूनच बाहेर पडायचे. मी ‘महानगर’ या सायं दैनिकात असतानाची गोष्ट. हंडोरे हे तेव्हा मुंबईचे महापौर होते. त्यावेळी त्यांचा पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही खटका उडाला होता. त्यावेळी या पँथरने ‘ महापौर बंगला सोडून जाईन आणि चेंबूरच्या झोपटपट्टीतून कामकाज करेन’ अशी सरळ धमकीच महापालिकेला दिली होती. त्यांनी दिलेल्या धमकीची गोपनीय माहिती ‘महानगर’ मध्ये त्यावेळी ठळक मथळ्याची बातमी होऊन झळकली होती!
चंद्रकांत हंडोरे यांचे स्वास्थ्य लवकर पूर्ववत होऊन कोरोनविरोधातील लढाई जिंकण्यात त्यांना यश मिळावे, यासाठी अमाप शुभेच्छा.
धारावी आणि रमाबा कॉलनीत फरक काय?
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कोरोनाने अख्ख्या जगालाच विळखा घातला आहे. त्याने आपल्या उभ्या देशाला ग्रासले आहे. त्यात आपला महाराष्ट्र आणि देशाशी आर्थिक राजधानी असलेली मुंबई यांची स्थिती भयावह आणि चिंताजनक झाली आहे. येथील बहुसंख्य जनता चाळी आणि झोपडपट्टीमध्ये राहत असून कोरोना आणि लॉक डाऊनमुळे त्याचे वित्त- जीवित धोक्यात आले आहे. पण मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांच्या जागी आय एस चहल यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वात आधी चर्चा झाली, ती धारावीच्या झोपडपट्टीची. त्याची दोन कारणे होती. पहिले म्हणजे, ती झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी म्हणून जगप्रसिद्ध आहे. अन दुसरे कारण म्हणजे, नव्या पालिका आयुक्तांनी पूर्वी एसआरए मध्ये काम केल्यामुळे त्यांना धारावीची खडा न खडा माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, धारावी चर्चेचा केंद्रबिंदु बनल्यामुळे आय एस चहल यांचेही लक्ष मग धारावीकडेच आधी वळले नसते तरच नवल. पण मोठी लोकसंख्या, घरांची दाटीवाटी, बकालपणा याबाबतीत धारावी आणि घाटकोपरची रमाबाई कॉलनी यांच्यात आता काही फरक करता येईल काय? किंबहुना कोरोनाची शिकार झालेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे राहात असलेल्या पी एल लोखंडे मार्गावरील आणि शहरातील इतरही झोपडपट्ट्या आता गुणात्मक दृष्ट्या धारावीपेक्षा किती वेगळ्या राहिल्या आहेत. राज्य सरकारने कोरोना टास्कसाठी नऊ आयएएस अधिकारी नेमले आहेत. त्यांच्यापैकी किती जण त्या झोपडपट्ट्याकडे फिरकले आहेत?
●●●●●●●●●●●●●●●●●●●