युगप्रवर्तकास अभिवादन करण्यास भीमसागर चैत्यभूमीवर..…!

युगप्रवर्तकास अभिवादन करण्यास भीमसागर चैत्यभूमीवर..…!

प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठीं जगभरातील अनुयायी चैत्यभूमी ,राजगृह व शिवाजी पार्क परिसरात जमा झालेत ……!

संपूर्ण ग्रामीण भारत आज मुंबईत दाखल झाला आहे ..यात प्रामुख्याने महाराष्ट्र ,पंजाब ,उत्तर प्रदेश ,बिहार ,झारखंड ,कर्नाटक ,गुजरात आदी ठिकाणावरून लाखोच्या संख्येने हजर झाली आहेत.महापालिकेने या सर्व अनुयायांची व्यवस्था केली आहे तसेच पोलीस व्यवस्था ही चोख बजावत आहेत.

दादर रेल्वे स्टेशन पासून येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केले जात आहे .
रांगेत दर्शन घेणाऱ्यांची संख्या लांब लांब राग लागली असून थेट प्रभादेवी पर्यंत रांग वाढत आहे .


मुंबई आणि परिसरातील अनुयायी आज 6 डिसेंबर रोजी दाखल होतात ….विविध संस्था ,प्रकाशन संस्था ,सामाजिक संस्था यांच्या बूथ ची व्यवस्था केली आहे . रेल्वे ,बेस्ट ,मुंबई पोर्ट ट्रस्ट ,मुंबई महानगर पालिका ,एल आई सी ,ओ एन सी आदी इन्शुरन्स कंपनी,बँकां व इतर सरकारी कंपन्या व इतर स्वयंसेवी संस्था यांचे अन्नदान व चहा पाणी यांचे बूथ आहेत .

सर्वात मोठीं विक्रमी पुस्तक व ग्रथ खरेदी या दोन दिवसात होत असते .

ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणारा भीमसागर नतमस्तक होऊन अथांग निरंतर वाहत आहे .

Next Post

जेष्ठ पँथर एस आर जाधव काळाच्या पडद्याआड

शनी डिसेंबर 7 , 2019
आंबेडकरी चळवळीतील लढवय्या जेष्ठ पँथर आणि शहीद भागवत जाधव व आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील नेते आद सुमेध जाधव यांचे जेष्ठ बंधू दि एस. आर. जाधव, (हसोळकर )डोंबिवली पूर्व यांचे आज दिनांक 07/12/2019 रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले, त्यांचा अंत्यविधी दुपारी 1वाजता […]

YOU MAY LIKE ..