कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्हा विभागाने केली गरजूंना मदत.

कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्या विभागाने केली गरजूंना मदत.
****************************************
किरण तांबे www.ambedkaree.com

बदलापूर: निराधारांना हवा असतो एक मदतीचा हात!
हीच वेळ असते महत्त्वाची एकमेका देण्या साथ!!

शिक्षक समाज घडवतात ते देशाचे भावी नागरिकाना देशात जनतेला कसं संकटकाली मदत करावी देशप्रेम कसे असावे याचे ऐतिहासिक दाखले देतात किंबहुना देश घडविण्याचे कामच शिक्षक करतात .देशावर आलेल्या संकटसमयी मग ते कसे मागे राहतील .शिक्षक ही आपले कार्य करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कास्ट्राईब शिक्षक संघटनने वतीने लाॕकडाऊनमूळे हातावर पोट असणाऱ्या गरजू कुंटूंबांना अन्नधान्य स्वरुपात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करत आपण ही देशावर आलेल्या संकटात काम करत आम्ही ही मागे नाही याचे प्रत्यय दिले.


कास्ट्राईब संघटनेच्या वतीने शिक्षक बंधु भगिनी यांनी दानाचे आवाहन करुन कोरोना या महामारी मध्ये उपाशीपोटी कुटुंब बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले(5 किलो तांदूळ,2 किलो गोडेतेल,2 किलो साखर,पाव किलो चहा पावडर,1किलो मुगडाळ,मिठपुडी, मसाला,)
किटचे वाटप करण्यात आले संकटसमयी संघटनेच्या वतीने उचललेला मदतरुपी खारीचा वाटा गोरगरीब गरंजूच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करणारा होता.


दिनांक 1 मे ते 3 मे दरम्यान कल्याण विठ्ठलवाडी, शहाड,अंबरनाथ, वांगणी, बदलापूर, उल्हासनगर,मुरबाड या ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप कोकणविभाग अध्यक्ष संतोष गाढे,ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राहुल हुंबरे,वंचित बहुजन आघाडीच्या महीला अध्यक्षा माया कांबळे,वांगणी-युवानेता नविन वाघमारे,मिलींद शिलवंत,प्रकाश वाघमारे, प्रसिध्दी प्रमुख योगेश येलवे,समता सैनिक दलाचे पदाधिकारी सुनिल भालेराव हे उपस्थित होते.या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोकण कार्याध्यक्ष दिनेश शिंदे,भिवंडी अध्यक्ष प्रविण कांबळे,भिवडी तालुका कार्याध्यक्ष महेश वनवे, भिवंडी म.न.पा.चे अरुण हिवरे,कल्याण अध्यक्ष सुनिल तायडे,के.डी.एम.सी.चे संजय ओकांरेश्वर ,शहापूर तालुकाध्यक्ष मनोज गोंधळी, भिवंडी संघटक प्रकाश सोनावणे,अंबरनाथ तालुका अध्यक्ष आनंद सोनकांबळे, कार्याध्यक्ष मिलींदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष प्रफुल्ल गडकरी,महीला उपाध्यक्षा विजया निंबाळकर, महीला आघाडी प्रमुख निता मोरे,महीला उपाध्यक्षा डाॕ.वर्षा अंबाडे,सल्लागार मिलींद कांबळे,खजिनदार अजय झांजरे,कायदेशिर सल्लागार गिता माटे,सरचिटणीस कलावती पहुरकर,उपाध्यक्षा सुषमा कुंभार,सदस्या सुरेखा कांबळे,वनिता भारती,अनघा सोनकांबळे या सर्वांच्या सहकार्याशिवाय व दानशूर शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्याशिवाय हे मानवतावादी मदतकार्य अशक्य होते.संकटाच्या काळात संघटनेच्यावतीने मदतरुपी खारीचा वाटा उचलल्याचे समाधान आज नक्कीच कास्ट्राईब ठाणेच्या सर्व परिवारांतील घटकांना आहे. परंतु हे मदतकार्य कोरोना महामारी संपेपर्यत अविरत सुरुच राहील.

त्यासाठी या पविञकार्यास यशस्वी करण्यासाठी मदतीचे हात पूढे यावेत असे आवाहन ठाणे जिल्हाअध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी व्यक्त केले.या स्त्यूत्य उपक्रमास अंबरनाथ युनिटमधून विशेष सहकार्य लाभले.अशी माहिती आनंद सोनकांबळे यांच्या कडून मिळाली.

-किरण तांबे www.ambedkaree.com
बदलापूर -ठाणे

Next Post

कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ....!

सोम मे 4 , 2020
कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ….! ************************************** कुमार कांबळे www.ambedkaree.com कल्याण सध्याची परस्थिती खूप गंभीर बनत चालली आहे . अशा परिस्थिती गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे हाल होत […]

YOU MAY LIKE ..