कल्याण मधील “बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी” यांनीं डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्ताने “जयंती घरा घरात,जयंती मना मनात” हे ब्रीद घेत अनोखी साजरी केली.
करोना च्या मुळे सध्या कल्याण मधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.याचा सारा सार विचार करत खलील विचार व्यक्त करत आव्हान करण्यात आले होते.
“Covid_19 सारख्या जैविक आपत्ती मुळे यावेळी आपण सर्वांनी १४ एप्रिल २०२1 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आपण आपल्या कुटुंबासह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करून घरामध्ये साजरी करावी. त्याप्रमाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात घरात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने
“आगळी वेगळी ऑनलाइन जयंती व स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.
ऑनलाईन जयंती चे स्वरूप व स्पर्धा स्वरूप खालील प्रमाणे ठेवण्यात आले होते.
“सेल्फी विथ फैमिली”
आपल्या घरातील जयंती साजरी करताना सहपरिवार 1 सेल्फी फोटो.
“रांगोळी स्पर्धा”:-
आपल्या घराबाहेरील रांगोळी चा फोटो व रांगोळी काढताना व्हिडीओ.
“चित्रकला स्पर्धा”:-
महापुरुषांचे व्यक्ती चित्र फोटो व 2 मिनिटांचा व्हिडीओ
वय गट 5 ते 16 वर्ष
“निबंध स्पर्धा” :-
भारतीय संविधानातिल मानवतावादी मूल्य
(खुला गट)
“कविता लेखन स्पर्धा” :-
मानवतावादी व समतावादी मूल्य असलेली कविता
“फॅन्सी ड्रेस स्पर्धा” :-
महापुरुषांची वेशभूषा धारण करून एका पेपर वर त्यांचे विचार लिहून फोटो काढून पाठवावा.
वरील स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव व पत्ता खालील क्रमांकावर व्हॉटसअप करावे असे बुद्धिस्ट युथ च्या वतीने सांगण्यात आले होते कल्याण मधील बऱ्याच आंबेडकरी जनतेने त्यास भरभरून प्रतिसाद देत या स्पर्धेत भाग घेतला.अजून ही स्पर्धा सुरूपासून या स्पर्धे भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव व पत्ता खालील क्रमांकावर व्हॉटसअप करावे असे कुमार कांबळे :- 9869377029,प्रवीण वाघ :- 9870081407,हर्षल बनसोडे :- 8097970985,सुशांत तिरपुडे:- 9769591391,सागर तायडे:- 8850 795 716
योगेश कांबळे:- +91 8850 799119 या”बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण” चे प्रमुख कार्यकार्त्यानी www.ambedkaree.com कडे कळविले आहे.
प्रमोद रा जाधव