आंबेडकरी तरुणांचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीं संवाद….!

प्रज्ञासुर्य बाबासाहेब,

आज तुमच्याशी बोलताना खूपच गहिवरून येतंय. खरंतर शब्दच ओठातून फुटत नाही, सुरुवात कुठुन करावी,कशी करावी हाच प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. या डोळ्यांनांही विश्वास बसेना की, मी तुमच्याशी बोलतोय. कोट्यवधी लोकांच काळीज असणा-या बाबासाहेबांशी बोलण्यापूर्वीच डोळ्यातील अश्रूंचा बांध हळूहळू फुटू लागतोय आणि तरीही डबडबलेल्या डोळ्यांना एकाग्र करत आपल्या उध्दारकर्त्याशी खूप काही बोलावं आणि मन मोकळं करावंस वाटतंय. पण हे सारं व्यक्त होण्यापूर्वीच शब्द मात्र अंतःकरणातून दाटून येत आहेत. विद्वत्तेच्या उंच हिमालयाकडे पाहताना माझी नजर सुध्दा ठेंगणी पडेल इतकं तुमचं कर्तृत्व उत्तुंग आहे.
अशा विशाल कर्तृत्व आणि अथांग बुध्दिमत्ता असणा-या महामानवाशी मी काय बोलावं? मूक झालेल्या शब्दांना ज्याने वाचा दिली त्या मूकनायकाचे आभार कसे मानावे? असंख्य संसार जोडणा-या आणि कित्येक निस्तेज पंखांना बळ देणा-या त्या युगप्रवर्तकाविषयी मी कशी कृतज्ञता व्यक्त करावी? असे अनेक प्रश्न मनात आधीच येत आहेत. आणि मन मात्र स्तब्ध होत आहे. तरीही एकेक आवंढा गिळत मनाला घट्ट करत डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांमधून तुमचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर आणून मी निरखून पाहतोय आणि मला आठवतोय माझा गतकाळ. माझी ओळख आणि माझं नवं अस्तित्व निर्माण करुन देणा-या माझ्या बाबासाहेबांचे आभार मी आज कोणत्या शब्दात व्यक्त करावे? आणि केले तरी ते कमीच पडतील इतके उपकारही अथांग आहेत. असं सारं काही मनात येतंय आणि डोळ्यातून अश्रूंचा महापूर कोसळू लागतोय.

बाबासाहेब, माणसाच्या जीवनात अनेक नाती निर्माण झालेली आहेत परंतु तुमच्याशी असलेलं आमचं नातं हे जगावेगळं आहे. आमच्या प्रत्येक पिढीचे तुम्ही “बाप”च आहात. कारण तुमच्यामुळेच आमच्या प्रत्येक पिढीला नवा जन्म मिळाला आहे. तुमच्या फोटोशिवाय आमच्या घराला सुद्धा घरपण येत नाही. सतत तुम्ही नजरेसमोरच असावे अशी सवय लागलीये जणू मनाला. बाबासाहेब तुमचं आमच्या आयुष्यात असणं हे कोणत्याही धनद्रव्याने विकत घेता न येणारं वैभव आहे. निसर्गातील सुर्य फक्त दिवसा प्रकाश देण्याचं काम करतो, परंतु आमच्या आयुष्यातील बाबासाहेब नावाचा ‘प्रज्ञासुर्य’ आम्हाला दिनरात, वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्यांना प्रकाशमय करीत आहे… विचारांची संजीवनी देऊन. आज तुमच्यामुळेच मुक्या जीवाला वाचा फुटलीये, आंधळ्याला नवी दृष्टी आलीय आणि पांगळ्याला चालण्यास स्वत:चे पाय मिळालेत, महिलांना स्वत:चा आवाज मिळालाय, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. किती मोठं करुणामय मन आहे तुमचं. इथल्या शोषित पिडीतांवर, दिनदुबळ्यांवर आणि या देशावरही तुमचे अनंत उपकार आहेत म्हणूनच सारा देश आज तुमच्याविषयी कृतज्ञ आहे. आयुष्यभर दुःख सहन करुन आणि स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करत तुम्ही दुसऱ्यांचे संसार उभे केलेत, आज तेच लाखो संसार तुम्हाला मनापासून धन्यवाद देत आहेत, करोडो हात जुळलेले आहेत तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी. किती तरी माथी नतमस्तक होतायेत तुमच्या प्रतिमेसमोर मानवंदनेसाठी. कोणी कवितेतून, कोणी गाण्यातून, कोणी पुस्तकातून तर कोणी कलेतून तुम्हाला अभिवादन करीत आहे. पण हे अभिवादन स्विकारण्यासाठी तुम्ही मात्र जवळ नाहीत. तुमच्याशिवाय आमचं आयुष्यच अपूर्ण आहे. तुमच्यामुळेच आमच्या जीवनाला सोन्याची झळाळी आलीय.

असं खूप काही मला आज सांगावं वाटतंय, बोलावंसं वाटतंय पण शब्दच माझ्या ओठातून बाहेर येईनात. तुमच्या कार्याचा गौरव करणारे, तुमच्या कर्तृत्वाचा महिमा सांगणारे आणि तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द माझ्या ओठात येवून थांबलेत. पण त्या शब्दांनाही आता धीर होत नाही… तेही निशब्द आहेत. डोळ्यातील आसवांना देखील मी थांबवू शकत नाही, दाटलेल्या कंठाला सुद्धा मी आवरु शकत नाही… यावेळी फक्त एकच इच्छा व्यक्त होतेय, तुमच्या हृदयाशी येऊन तुम्हाला घट्ट मिठी मारत म्हणावं… “तुम्ही आमच्या आयुष्याचे प्राणवायू आहात बाबासाहेब…. प्राणवायू….!प्रज्ञासुर्य बाबासाहेब,

आज तुमच्याशी बोलताना खूपच गहिवरून येतंय. खरंतर शब्दच ओठातून फुटत नाही, सुरुवात कुठुन करावी,कशी करावी हाच प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. या डोळ्यांनांही विश्वास बसेना की, मी तुमच्याशी बोलतोय. कोट्यवधी लोकांच काळीज असणा-या बाबासाहेबांशी बोलण्यापूर्वीच डोळ्यातील अश्रूंचा बांध हळूहळू फुटू लागतोय आणि तरीही डबडबलेल्या डोळ्यांना एकाग्र करत आपल्या उध्दारकर्त्याशी खूप काही बोलावं आणि मन मोकळं करावंस वाटतंय. पण हे सारं व्यक्त होण्यापूर्वीच शब्द मात्र अंतःकरणातून दाटून येत आहेत. विद्वत्तेच्या उंच हिमालयाकडे पाहताना माझी नजर सुध्दा ठेंगणी पडेल इतकं तुमचं कर्तृत्व उत्तुंग आहे. अशा विशाल कर्तृत्व आणि अथांग बुध्दिमत्ता असणा-या महामानवाशी मी काय बोलावं? मूक झालेल्या शब्दांना ज्याने वाचा दिली त्या मूकनायकाचे आभार कसे मानावे? असंख्य संसार जोडणा-या आणि कित्येक निस्तेज पंखांना बळ देणा-या त्या युगप्रवर्तकाविषयी मी कशी कृतज्ञता व्यक्त करावी? असे अनेक प्रश्न मनात आधीच येत आहेत. आणि मन मात्र स्तब्ध होत आहे. तरीही एकेक आवंढा गिळत मनाला घट्ट करत डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांमधून तुमचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर आणून मी निरखून पाहतोय आणि मला आठवतोय माझा गतकाळ. माझी ओळख आणि माझं नवं अस्तित्व निर्माण करुन देणा-या माझ्या बाबासाहेबांचे आभार मी आज कोणत्या शब्दात व्यक्त करावे? आणि केले तरी ते कमीच पडतील इतके उपकारही अथांग आहेत. असं सारं काही मनात येतंय आणि डोळ्यातून अश्रूंचा महापूर कोसळू लागतोय.
बाबासाहेब, माणसाच्या जीवनात अनेक नाती निर्माण झालेली आहेत परंतु तुमच्याशी असलेलं आमचं नातं हे जगावेगळं आहे. आमच्या प्रत्येक पिढीचे तुम्ही “बाप”च आहात. कारण तुमच्यामुळेच आमच्या प्रत्येक पिढीला नवा जन्म मिळाला आहे. तुमच्या फोटोशिवाय आमच्या घराला सुद्धा घरपण येत नाही. सतत तुम्ही नजरेसमोरच असावे अशी सवय लागलीये जणू मनाला. बाबासाहेब तुमचं आमच्या आयुष्यात असणं हे कोणत्याही धनद्रव्याने विकत घेता न येणारं वैभव आहे. निसर्गातील सुर्य फक्त दिवसा प्रकाश देण्याचं काम करतो, परंतु आमच्या आयुष्यातील बाबासाहेब नावाचा ‘प्रज्ञासुर्य’ आम्हाला दिनरात, वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्यांना प्रकाशमय करीत आहे… विचारांची संजीवनी देऊन. आज तुमच्यामुळेच मुक्या जीवाला वाचा फुटलीये, आंधळ्याला नवी दृष्टी आलीय आणि पांगळ्याला चालण्यास स्वत:चे पाय मिळालेत, महिलांना स्वत:चा आवाज मिळालाय, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. किती मोठं करुणामय मन आहे तुमचं. इथल्या शोषित पिडीतांवर, दिनदुबळ्यांवर आणि या देशावरही तुमचे अनंत उपकार आहेत म्हणूनच सारा देश आज तुमच्याविषयी कृतज्ञ आहे. आयुष्यभर दुःख सहन करुन आणि स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करत तुम्ही दुसऱ्यांचे संसार उभे केलेत, आज तेच लाखो संसार तुम्हाला मनापासून धन्यवाद देत आहेत, करोडो हात जुळलेले आहेत तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी. किती तरी माथी नतमस्तक होतायेत तुमच्या प्रतिमेसमोर मानवंदनेसाठी. कोणी कवितेतून, कोणी गाण्यातून, कोणी पुस्तकातून तर कोणी कलेतून तुम्हाला अभिवादन करीत आहे. पण हे अभिवादन स्विकारण्यासाठी तुम्ही मात्र जवळ नाहीत. तुमच्याशिवाय आमचं आयुष्यच अपूर्ण आहे. तुमच्यामुळेच आमच्या जीवनाला सोन्याची झळाळी आलीय.

असं खूप काही मला आज सांगावं वाटतंय, बोलावंसं वाटतंय पण शब्दच माझ्या ओठातून बाहेर येईनात. तुमच्या कार्याचा गौरव करणारे, तुमच्या कर्तृत्वाचा महिमा सांगणारे आणि तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द माझ्या ओठात येवून थांबलेत. पण त्या शब्दांनाही आता धीर होत नाही… तेही निशब्द आहेत. डोळ्यातील आसवांना देखील मी थांबवू शकत नाही, दाटलेल्या कंठाला सुद्धा मी आवरु शकत नाही… यावेळी फक्त एकच इच्छा व्यक्त होतेय, तुमच्या हृदयाशी येऊन तुम्हाला घट्ट मिठी मारत म्हणावं… “तुम्ही आमच्या आयुष्याचे प्राणवायू आहात बाबासाहेब…. प्राणवायू….!”
तुमचाच, बुध्ददिप सावंत

प्रस्तुत लेखक www.ambedkaree.com चे मुंबईतील प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Next Post

युगप्रवर्तकास अभिवादन करण्यास भीमसागर चैत्यभूमीवर..…!

शुक्र डिसेंबर 6 , 2019
युगप्रवर्तकास अभिवादन करण्यास भीमसागर चैत्यभूमीवर..…! प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठीं जगभरातील अनुयायी चैत्यभूमी ,राजगृह व शिवाजी पार्क परिसरात जमा झालेत ……! संपूर्ण ग्रामीण भारत आज मुंबईत दाखल झाला आहे ..यात प्रामुख्याने […]

YOU MAY LIKE ..