जगाचा ज्ञान सूर्य …….आणि किड्याची वळवळ…..!

जगाचा ज्ञान सूर्य …….आणि किड्याची वळवळ…..!


जगाला ज्ञानाचा मार्ग देणारे बुद्ध…… त्यांचा धम्म्म आणि संघ हे जगात अनादी काळापासून वंदनीय आहेत ..! बुद्ध ही जीवन पद्धती आहे ते तो जगाला ,समजला आणि अनुभवला तो धन्य झाला .

बुद्ध अंधकार ,अज्ञान ,अंधश्रध्दा आणि थोतांड याचा विनाश करतो त्या पासून दूर राहून जगाला ज्ञानाचा सन्मार्ग देतो .
बुद्धाचे तत्वज्ञान या जगात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वीकारले गेले .

प्रमुख प्रसारक सम्राट अशोक बुद्ध स्वीकारून सम्राटा चा ही ज्ञानियांचा जगद सम्राट झाला …….!त्याच्या कार्यकाळात भारत हा गुलामगिरी मुक्त ,जातीमुक्त आणि धर्ममुक्त होता कल्याणकारी सम्राट म्हणून आजही ज्याचे नाव आदराने घेतले जाते तो जगत सम्राट अशोक बुद्धाला शरण गेला.

सूर्य आकाशात असतो ……तो आपल्या प्रकाशाने जगातला कोपरा कोपरा प्रकाशमान करतो . ज्याने आपल्या सभाववती अंधार पांघरूण घेतला आहे ,जो अंधाराला कवटाळून बसला आहे ,जो अज्ञानाच्या असनकल्पनेला चिटकून बसला आहे ….ज्या मोहमया अडकून धर्माच्या नावावर लोकांना फसवणूक करत आहेत असे जंतू अंधारात चाचपडत असतात …..!

सूर्याच्या किरणांची त्यांना भीती असते कारण ती तेजस्वी किरणे त्यांना त्यांचे आयुष्य संपवू शकतात म्हणून असे किडे आपली वळवळ अंधारयुगात करत राहतील त्याना …….जंतू समजून ज्ञान रुपी कीटकनाशके फवारून समाजमन शुद्ध करून बुध्द अधिक समजून घ्यावा असे वाटते म्हणून……!

किड्याची वळवळ ………..! डॉ.बाबासाहेबांचा आंबेडकर यांचा डोस घेऊन संपवावी असे आमचे वैयक्तिक मत आहे .
-प्रराजा

Next Post

मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने गुणवंत विद्यार्ध्यांचा कल्याणमध्ये सत्कार

सोम सप्टेंबर 30 , 2019
मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने कल्याण पूर्व पश्चिम येथील गुणवंत विध्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन करण्यास सतत कार्यरत असणारी कल्याण येथील मानव सेवा फौंडेशन ही संस्था गरजू आणि गुणवंत विध्यार्थी यांना सतत शिक्षणाकरिता सतत मदत […]

YOU MAY LIKE ..