प्रसिध्द संगीतकार राजेश ढाबरे यांचे गाण्याच्या माध्यमातून करोना व्हायरस वर जनजागृती गीत .
सध्या जगभर करोना व्हायरस ने ग्रासले आहे ..सारे विश्व जणू काही एका व्हायरस च्या विरोधात युद्ध लढत आहे हजारो माणसांचे प्राण आता पर्यंत या व्हायरस ने घेतले आहे . चीन मधून निर्माण झालेला हा व्हायरस आता जगभरातील लोकांना मृत्यच्या जबड्यात गिळंकृत करत आहे .जगभरातील शास्त्रज्ञांनी आपले कसब पणाला लावून त्यावर तोडगा शोधत आहेत .जगातील सर्व देशांचे प्रमुख आपल्या परीने त्यावर उपाय योजना करीत आहेत .
आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या परीने मार्गदर्शन करीत असून देशातील वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे .डॉक्टर,हॉस्पिटल, नर्स ,स्वच्छता कर्मी,महानगरपालिका ,शहर आस्थापना ,पोलीस आणि सरकारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून दिवस रात्र काम करीत आहेत.
भारतीय लोकांत अधिकाधिक प्रमाणात जनजागृती व्हावी व समाजात विविध लोकांना या आजारविषयी माहिती व्हावी म्हणून विविध कंपन्या कलाकार आपापल्या परीने मेहनत घेत आहेत . या सर्व घटनेचे आंबेडकरी कलाकार मागे कसे राहतील त्यात नंदेश उमप यांचा पोवाडा असोत की राजेश ढाबरे सारखे सामाजिक भान असलेले अधिकारी असो……!
तथागत बुद्धांवर हिंदीतून संगीत आणि गाणी बनविणारे प्रसिद्ध संगीतकार आणि महाराष्ट्रातील एक सनदी अधिकारी मा राजेश ढाबरे यांनी ही आपल्या परीने करोना व्हायरस वर जनसामान्यांना समजेल असे सोप्या शब्दात जनजागृती करनारे एक रॅप गीत बनवून नुकतेच त्यांच्या Rajeshdhabre-themusicmonk FB या सोशल मेडिया पेज वर पोस्ट केले आहे .
मा राजेश बरे विषयी थोडक्यात माहिती
राजेश फत्तेसिंग ढाबरे हे एक भारतीय संगीतकार असून ते विविध सामाजिक विषयांवर संगीताची निर्मिती केली आहे .
त्यांचे बुद्ध ही बुद्ध है (२०१०) आणि सिद्धार्थ (२०१3) हे अल्बम बौद्ध धर्मातील तत्वज्ञानावर आधारित आहेत. त्यांच्या सुमधुर आवाज आणि संगीतमय रचना व गायकीने भारतातील लोकांना रचनात्मक संगीताचे दशॆन त्यांनी घडविले आहे.
ते मुळचे नागपूर शहरातील असून.ते सध्या मुंबईत कस्टम आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. मा राजेश ढाबरे हे एक गायक, गीतकार आणि समाजसेवक आहेत.
सध्या ते संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुंबई, चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
त्यांचे हे गित ऐकूयाआणि कोरोना वर अट़काव शिकूया..!
https://www.facebook.com/271064750270367/posts/514665965910243/?sfnsn=wiwspmo&extid=9kRQ8B3tjB9e3FgG&d=n&vh=e
– प्रमोद रा जाधव
www.ambedkaree.com