-
बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ?
यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ?
तर वाचा पुढील प्रमाणे ….
१) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण तेवढी ताकद बुद्ध संस्कारात नक्कीच आहे.
२) प्रत्येक घरी विचार करणे, विवेक प्रयोग, विज्ञान व प्रमाण आधारित प्रयोग व प्रयोगशाळा ( संशोधन) इत्यादी प्रमाणे जीवन शैली प्रत्येक भारतीयाची बनेल.
३) दुःखाचे मूळ शोधून त्यावर उपाय सुरु होतील.
४) जातीरोग,जातीविष व जातीबीज याचे नाश व्हायला मदत होईल.
५) घरोघरी भांडण, तंटा, द्वेष, क्रोध, मनभेद,चोरी, छल – कपट, अपमान, अहंकार यावर नियंत्रण येऊ शकते.
६) मैत्री, करुणा, प्रेम, ध्यान-ज्ञान,जीवनाचा अर्थ का बोध होऊ शकतो.
७) अत्त दीप भव, स्वयम् प्रकाशित व्हा, स्वतःची मदत करा, स्वतःला प्रेरणा मिळो अश्या भावनांचा विकास होऊ शकतो.
८) अज्ञान, अविचार, आळस, अविज्ञान, आणि अन्धविश्वास या संस्कारापासून मुक्त होऊ शकता.
९) सर्व घातक व्यसनापासून मुक्त होऊ शकता.
१०) वर्तमान काळात जगण्याचे संस्कार होतील, अप्रिय – दुःखदायक भूतकाळ विसरण्यास मदत होईल.
११) जीवन – शरीर हे नाशवंत आहे, कोणताच पुनर्जन्म नाही, जन्माच्या अगोदर वा मेल्यानंतर कोणतेच जीवन नसते, हे जीवन हा क्षण ( moment) पहिला व अंतिम आहे असे ज्ञान सर्वाना होईल.
१२) विश्व – तारे – उपग्रह – ग्रह – पृथ्वी – पाणी – वायु निर्मिति, जीव – सर्व जलचर प्राणी – मनुष्य झाडे यांची निर्मिति ना ईश्वर, ना परमेश्वर, ना God, ना अल्लाह ना कुठल्या चमत्काराने झाली याचे ज्ञान होईल.
१३) भाग्य – नशीब – आत्मा – सर्व नियंत्रक शक्ति, ईश्वर, परमेश्वर, God, अल्लाह, देवी-देवता, चमत्कार इत्यादि संस्कारापासून मुक्त व्हाल.
१४) भारत विश्वगुरु बनेल ध्यान – ज्ञान – विज्ञान – मानवतावादी संस्करानी.
२२ प्रतिज्ञा अभियान
—प्रचाराकरिता
शब्दांकन विनोद पवार कल्याण