भाजपा देश कोठे नेत आहे?

भाजपा देश कोठे नेत आहे?

असहिष्णतेचा मुद्दा उपस्थित करुन भाजपने २०१५ साली चाचपणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय जनता सजग आहे की गाढ झोपेत आहे याची खात्री करण्यासाठी भाजपप्रणीत संचटनांनी २०१५ ते २०१९ पर्यंत जे प्रयंग केलै त्यावरून कळून चुकते. अर्थातच या कृतीकार्याची प्रयोगशाळा नागपुरच्या रेशीमबागेत असून तेथून सारी सूत्रे हालतात हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. संघ आणि दहशतवाद हे घट्ट समीकरण बनले असून, देशात भितीचे वातावरण निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे, हे प्रकार जाणिवपूर्वक अधूनमधून केले जातात. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा कट नव्हता, तर धर्माच्या नावावर अंधश्रद्धा परविण्याच्या विरोधात सातत्याने केलेल्या प्रहारामुळे धर्मांध प्रवृत्ती खवळली होती हे जेवढे सत्य आहे, त्याही पेक्षा दाभोलकरांमधील व्यक्त होणारा परिवर्तनवादी सुधारक त्यांचा ब्लडप्रेशर वाढवित होता हे पहिले कारण सांगता येईल.

दुसरे कारण १९८० पासूनचा जर डॉ.दाभोलकरांचा परिवर्तनवादी, बहुजनवादी जधतेमधला वावर, समतावाद्यांच्या विचारपीठावरून व्यक्त केलेली मते, अगदी मंडल प्रश्नावर ओबीसींना गुमराह करण्याचा होत असलेला प्रयत्न इत्यादी प्रश्नांवर घणाघाती केलेल्या टीका , सर्वात मोठी पोटदुखी म्हणजे फुले,शाहु, आंबेडकरी विचारधारेचा केलेला स्वीकार व त्या विचारपीठावर असलेला वावर अशी अनेक कारणे देता येतील. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाठोपाठ झालेल्या पानसरे, कुलबूर्गी व पत्रकार गौरी लंकेश हत्येने संघ किती टोकाची भूमिका घेतो हे स्पष्ट झाले. याचे कारण असे की, २०१७ मध्ये अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबात सनातन प्रभातसह संघाकडे हा रोख हो़ता. याच दरम्यान परिवर्तनवादी जनतेने ‘ सनातन’ वर बंदी आणण्याची मागणी केली. गेले वर्षभर सनातनची कोठेच हालचाल दिसत नाही.


खरेच या संघटनेवर बंदी आणली का याचा कोणालाच थांगपत्ता नाही. ही फारमोठी धोक्याची घंटा आहे. बेसावध ठेवून परिवतर्तनवाद्यांना रोखणे, व योग्य संधी पाहून काटा काढणे हे प्रकार झाले असून, भिमा कोरेगाव हिंसाचार हा जाणिवपूर्वक घडवून आणलेला कट होता हेही लक्षात आले.धर्मांधता पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. चार महिन्यांपूर्वी तामिळनाडूतील वेदरमण्यन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तलवारीने फोडला. म.गांधीनी आयुष्यभर वर्णाश्रम व्यवस्थेचा पुरसस्कार केला, तरीही फाळणीनंतर उफाळून आलेल्या प्रेमाचा राग मनात सलत होता तो संघाच्या महिला पदधिकार्याने गांधींच्या पुतळ्यावर पिस्तुल चालवून अद्यापही राग कायम असल्याचे दाखवून दिले होते या घटनांचा बहुजनवादी जनतेला विसर पडता काम नये.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात संत रविदासांचे मंदिर तंडण्यात आले. राम मंदिर प्रश्नाचा आणि रविदासांच्या मंदिराचा संबंध काय? रविदासांनी पाखंडी प्रवृत्तीवर प्रहार केले. समतेचा विचार समाजात रूजविण्याचा प्रयत्न केला. रामाने यापैकी एक कार्य केल्याचे उदाहरण सांगता येणार नाही. मागासवर्गीयांच्या अस्मितेला नख लावून तेढ निर्माण करण्याचा नीच कट असून, असहिष्णुतेला बळ देणे हा जसा हेतू आहे, तद्वतच सामाजिक सलोखा बिघडविणे, शांत समाजाला रस्त्यावर आणण्यास प्रवृत्त करून, दंगलसदृश्य वातावरण निर्माण करणे हे प्रकार केले जात आहेत. मंदिर जाळून विचार जाळता येत नाही. महामानवांचा अवमान त्यांच्या हयातीत झाले आहेत. त्याचा वचपा काढायचा असेल तर, समग्र मागासवर्गीयांचे संघटन हाच पर्याय असून, बहुजनवादी जनता याच प्रक्रियेची वाट पाहत आहे. परंतु नेतृत्वाच्या हव्यासापोटी जनतेला प्रवाहापासून रोखण्याचे होत असलेले प्रयत्न राजकीय आणि सामाजिक स्तर ठिसूळ करण्यास मदत करत असतो. म्हणूनच तथाकथित नेते हवेत की, समाजाचे ऐक्य याचाही जनतेने विचार करायची हीच वेळ आहे.
प्रतिगामी शिरजोर होत चालला असून, परिवर्तनवाद्यांचे मजबूत संघटन हाच पर्याय होय.

गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
सोमवार, दि.२६ आॅगस्ट २०१९

Next Post

चर्मकार समाजाच्या उद्याच्या मोर्चाला गणराज्य अधिष्ठानचा पाठिंबा

सोम ऑगस्ट 26 , 2019
चर्मकार समाजाच्या उद्याच्या मोर्चाला गणराज्य अधिष्ठानचा पाठिंबा संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला ‘ शिका , संघटित व्हा, […]

YOU MAY LIKE ..