अजब सरकार…..

भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान (एल्गार परिषद) चे  सदस्य सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार कबीर कला मंचाचे सांस्कृतिक सदस्य (एल्गार परिषद) व भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियान चे रमेश गायचोर, सागर गोरखे या कार्यकर्त्यांवर दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे दिनांक 1 जानेवारीला दंगल घडली असा आरोप ठेवून गुन्हा नोंद केला आहे.

ह्या घटनेला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. आज सकाळी 6 वाजता मुंबई येथे तसेच पुणे येथे प्रत्येक ठिकाणी 10 ते 12 पोलीस येऊन घराची तपासणी करत आहेत.त्यांच्याकडे सर्च वॉरंट आहे.

भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी मनोहर भिडे मोकाट फिरत आहे. जातीयवादी मुख्यमंत्री त्याला क्लीन चिट देतोय. ह्या मुख्यमंत्र्याने भिडेचा तपास न करता निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

ह्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविला पाहिजे. लढाऊ कार्यकर्त्यांवर दमण लादून हे सरकार विरोधाची धार बोथट करीत आहे जेणे करून यांच्या विरोधात पुन्हा कोणी बोलू नये.

परंतु यांनी हे लक्षात घ्यावे की ही शिवाजी, फुले,शाहू ,बाबासाहेब आणि भगतसिंग यांचे अनुयायी कुठल्याही दमनाला भिक घालीत नाहीत

मुजरीम वो नहीं जो जेलों में कैद है
मुजरीम वो भी नहीं जो जेलोसें फरार है
असली मुजरीम तो वो है
जो तख्त पर बरकरार हैं 

आत्ताच या सर्व दमानविरोधात ABP Maza ह्या न्युज चॅनेलनी हर्षाली पोतदार यांची मुलाखत घेतली त्याचे चित्रण ,www.ambedkaree.com  ला नुकतेच मिळालेय 

-दिनकर भालेराव 

 

Next Post

अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक

मंगळ एप्रिल 17 , 2018
अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक बुवा बाबा अम्मा बापु यांच्या नादाला लागलेल्या कित्येक भारतीयांना अंधश्रध्देतुन बाहेर काढण्याची गरज आहे. भारतात धर्मसत्तेपाठोपाठ या भोंदु बाबांची ही सत्ता आता मोठ्या प्रमाणात कार्य करत असुन अज्ञानी अन पैशासाठी हपापलेल्या लोकांची शिकार ते अलगद पणे […]

YOU MAY LIKE ..