भीमाची लेक अर्थात मा. सुषमाताई अंधारेंचे हल्यासंदर्भातील खुले पत्र

स्थळ नाशिकरोड पोलीस स्टेशन

दादाहो माय माऊल्याहोकाल माझ्यावर रात्री 12:10 मिनीटांनी प्राणघातक हल्ला झाला. नंबरप्लेट नसलेल्या तीन गाड्या पाठलाग करत होत्या. पैकी एका पांढरया व्हॅन वजा गाडीने मागून धडक काय होतय हे कळायच्या आत पून्हा जोरदार धडक बसली. मुंबई आग्रा महामार्गावर इंदौर च्या बायपास वर मृदंग रेस्टॉरंट च्या समोर पुलालगत हा थरार तब्बल साडेतीन मिनीटं चालू होता… वाहन चालकाची गाडी नंबरप्लेट नसलेली होती. गाडीच्या आत किती लोक आहेत हे कळू शकले नाही कारण अंधार होता आणि काच ही बहूधा काळी होती आमच्या गाडीच्या मागच्या बाजुने पक्त ड्रायव्हर चा स्टेअरींग वरचा एक हात दिसू शकला. त्या हातावर खुपसारे रंगीबेरंगी दोरे बांधलेले होते.

आमच्या गाडीला पाच पन्नास सेकंदाच्या अंतराने तीन ते चार वेळा धक्के बसले. माकडहाड आणि पाठीच्या मणक्याला जबर मार आहे. पण बचावले.नाशिकला पवन भाऊ पवार, शशीभाई उन्हवणे , योगेश लोखंड नाशिकरोड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करायला गेलो असता सिनीयर PI पंढरीनाथ ढोकणे यांनी मला तक्रार दखल करून घेणे तर दुर उलट आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर भादवी 307 नुसार गुन्हा नोंद झालाय. पणमला यांच्याकडून न्याय किंवा संरक्षण मीळेल याची आशा मावळलीय

या सगळ्या काळात ऑल ईंडीया आंबेडकराईड मीशन UAE , श्रीलंकन बौध्द भीक्खू संघ , महातेकर काका , ज वी पवार काका , विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे , आमदार डॉ सुजीत मींचेकर , सुनील भैय्या खांबे , RLS Group औरंगाबाद MIM चे आमदार ईम्तीयाज जलील , मुस्लीम सत्यशोधक चे तांबोळी सर , ईरफान खाकी , मीलींद भैय्या जगताप , राहूल गायकवाड भैय्या , अविनाश डोंगरे , सारीपुत्र ढवळे , वैभव छाया , प्रसाद देठे , निलेश आंबेडकर , आशिष तांबे , आमदार उषाताई दराडे आमदा सामाजिक न्यायमंत्री बडौले, पुण्याचे उपमहापौर सिध्दार्थ धेंडे , नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे , भारिप बहूजन महासंघाचे कारंजा नगराध्यक्ष बाळासाहेब ढोके सचीन वाघमारे मास मुन्हमेंट पुणे सर्व भाऊ , आणि नाशिक तथा संपुर्ण महाराष्ट्रातील मायमाऊल्यानी जो मानसिक आधार दिला तो लाखंमोलाचा आहे.

सर्व भावा बहिणींचे आभार.

आपली बहिण लेक सुषमा अंधारे

( त्यांच्याच FB  वाॅल वरून सभार )

Next Post

संयुक्त महाराष्ट आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर -संपादक संजय कोचरेकर

शुक्र मे 4 , 2018

YOU MAY LIKE ..