क्रांती भूमी महाड येथे भारिप उभारणीकरिता होणार सभा
महाड तालुक्यातील आणि शहरातील सर्व बंधु आणि भगिनींना विनम्र आहवान करण्यात आले आहे की,
सध्याची समाजिक, राजकीय आणि शैक्षणिक परिस्थीती लक्षात घेता आपण सर्वांनी एकञ येण्याची काळाजी गरज आहे आणि त्याकरीता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आणि भारिप बहुजन महासंघाचे सर्वसेवा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची भक्कम उभारणी करण्याच्या निमित्ताने अतिशय महत्वाची बैठक दि. १८.०५.२०१८ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता ऐतिहासिक क्रांतीभुमी चवदार तळे महाड येथे भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आयु दिपकदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये संपन्न होणार आहे.
तरी तमाम आंबेडकरवादी विचारधारणेच्या तरुण,तरुणींना, आणि महीलांना विनंती आली आहे की आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जनसामान्य पर्यंत पोहचविण्या करिता, त्यांचे विचार आणि कार्य जन सामान्यात पोहचविण्याकरीता भारिप बहुजन महासंघा मध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात येत आहे विशेष म्हणजे खलील महत्वाची सुचना देऊन उपस्थितांतून
या मिटींगमध्ये कार्यकारणीची निवड करावयाची असल्यामुळे इच्छुकाने खालील माहीती भरुन पाठवावी.
नाव ,मोबाईल नंबर,पत्ता ,शिक्षण आणि व्यावसाय आदी माहिती ९८३३३१०८५३ या नंबरवर व्हाटसअप करावी असे कळविले .
मिटींगचे विषय खलील प्रमाणे आहेत
१) महाड शहर युवा कार्यकारणी कमिटी तयार करणे
२) महाड तालुका युवा कार्यकारणी कमिटी तयार करणे
३) विद्यार्थी संघटना बांधणे
वरील मिटींगचे आयोजक हे महाड शहरातील आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील व महाड रायगड परिसरातील सर्वांच्या परिचयाचे असणारे दिपकदादा गायकवाड हे असून त्यांच्या सोबत विविध महाड शहर, ग्रामीण ,मुंबई ,ठाणे,भिवंडी आणि कल्याण येथील तरुण कार्यकरत्ये त्याना साथ देत आहेत असे पत्रकात म्हटले आहे .
महाड येथील क्रांती भूमीत लवकरच आता राजकीय बदल दिसून येईल .
या मिटिंगची दखल महाड वाशीय आंबेडकरी तरुणांनी गंभीरपणे घेतली आहे विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी आता एकाच पक्ष्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आव्हान ही आयु सचिन जाधव (या मिटिंगचे प्रसिद्धी प्रमुख )यांनी केले आहे.
हा एक नवा बदल आहे कोकणात हा प्रयोग यशस्वी झाल्यास चळवळीस नवी दिशा मिळेल