सूर्यपुत्रास अभिवादन…..!

सूर्यपुत्रास अभिवादन…..!

“सूर्यपुत्र यशवंत (भय्यासाहेब)आंबेडकर”
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले .

भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले .त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला . त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.

नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते.

बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा ” Thoughts on pakistan” हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ ” federation versus freedom ” हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला ” Thoughts on linguistic states ” हा ग्रंथ सुद्धा भाय्यासाहेबांनी छापला .

त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित ” बौद्धपर्व ” हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.
भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला .

चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . s/c federation आणि R.P.I पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस ” अमृत महोत्सव ” म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले . या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून ” भीम -ज्योत ” “महु ते मुंबई ” काढण्याचे ठरविले व २७-३-१९६६ रोजी “भीम -ज्योत ” भारताचे मजूर मंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते.
भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.

बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. “भारत बौद्धमय करीन ” हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. ” बौद्ध जीवन संस्कार पाठ ” या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत

धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव “महापंडित काश्यप ” असे ठेवण्यात आले होते.
१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले ” आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा ” आपण आमच्यासोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ .
स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले ” मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .
भय्यासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी झोकून दिले.

अशा ह्या सूर्यपुत्राच्या क्रांतीकारी स्मृतीस www.ambedkaree.com चे स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम…..!

Next Post

वं बआ चा सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.

गुरू सप्टेंबर 19 , 2019
वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.व ब आघाडीची सत्ता संपादन रॅली नागपूर तेथून सुरू झाली होती .म अण्णाराव पाटील या रॅलीचे नेतृत्व करत होते त्याची सांगता काल कोल्हापूर येथे व ब आ चे नेते आड प्रकाश आंबेडकर […]

YOU MAY LIKE ..