समाजातील तरूण पिढीचे आर्थिकदृष्टय़ा प्रबोधन होण्यासाठी “अस्मिताचा” अभिनव उपक्रम. …

समाजातील तरूण पिढीचे आर्थिकदृष्टय़ा प्रबोधन होण्यासाठी “अस्मिताचा” अभिनव उपक्रम. …

 

“अस्मिता” विवाह समारंभात उपस्थितांना व्यवसायिक मार्गदर्शन करणार ..

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक चळवळीला संघटीत होऊन (सहकाराने) प्रत्यक्षात कार्यान्वित केल्याशिवाय समाजाची व्यवसायिक मानसिकता बदलली जाणार नाही. …प्रत्येक युवक-युवतीने आता शिक्षणाबरोबर व्यवसायाला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे परिणामी आपला समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल.

अस्मिता मल्टिपर्पज आॅर्गनाझेशन गेल्या दोन वर्षांपासुन समाजात आर्थिक विकासावर विविध उपक्रम राबवत आहे.त्यात व्यावसाय मार्गदर्शन,सहकारातुन व्यवसाय निर्मिती,औद्यौगिक जगताची सामाजिक जबाबदारी आदि विषयांवर  कार्यशाळाचे आयोजित केलेय.

या वेळी नवा उपक्रम विवाह संमारभात उपस्थितांना व्यावसायिक मार्गदर्शन

याची सुरूवात दि. २२ एप्रिल ला कल्याण मधुन सुरू होणार आहे या विषयी www.ambedkaree.com शी संवाद साधतांना संस्थेचे चेअरमेन मा. विक्रांत वालकर म्हणाले की समाजात व्यवसायिक जनजागृती  होणे गरजेचे आहे त्याकरिता आम्ही विविध उपक्रमांद्वारे काम करित असतो त्याचाच हा भाग आहे. अस्मिताचे सदस्य दिपक पवार यांनी या  कामात पुढाकार घेतला आहे. असे सांगितले.

या निमित्त प्रथमच असा उपक्रम राबवण्यात येत आहे . असे अस्मिता टिम तर्फै कळविले आहे.

शब्दांकन : शितल प्रमोद जाधव

 

Next Post

अजब सरकार.....

मंगळ एप्रिल 17 , 2018
भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान (एल्गार परिषद) चे  सदस्य सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार कबीर कला मंचाचे सांस्कृतिक सदस्य (एल्गार परिषद) व भीमा कोरेगाव शौर्य प्रेरणा अभियान चे रमेश गायचोर, सागर गोरखे या कार्यकर्त्यांवर दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर घेतलेल्या […]

YOU MAY LIKE ..