आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया,
आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा.
हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय समारंभात उपस्थित राहून विशेष स्टाॅल उभारून आर्थिक चळवळीची , औद्योगिक जगतातील संधींची माहिती बंधू भगिनींना देण्याचा कार्यक्रम आखला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ३० एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी घोडबंदर रोडवरील सोनावले व जाधव यांच्या परिणय समारंभात सदर स्टॊल उभारून वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली . नवे नवे तांत्रिक स्किल घेऊन नोकऱ्या कश्या मिळवायच्या आणि उद्योग कसे उभारायचे ह्याचे सम्पूर्ण सादरीकरण आणि चित्रफीत लग्नाच्या लॉनवरील भव्य पडद्यावर सादर करण्यात आली
तरुण नवं दाम्पत्य कुणाल सोनावले आणि सोनल ह्यांनी सुरवातीपासून ह्या सामाजिक कार्यात साथ देत असतात. कुणाल सोनावले सध्या एका सरकारी बँकेत मॅनेजर म्हणून कार्यन्वित असून , तो आणि सोनल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही करीत आहेत.
वरील उपक्रमास सोनावले आणि जाधव कुटुंबीयाने दिलेल्या सहकार्याबद्धल त्यांचे विशेष आभार. अस्मिताचे विक्रान्त वालकर , प्रमोद जाधव , काशिनाथ पवार साहेब ह्यांचे सुद्धा आभार…..
सामाजिक भान असणाऱ्या ह्या कुणाल आणि सोनलला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
(चला उद्योजक घडूवू या…. समाज आर्थिक स्वावलंबी करूया, शासनकर्ती जमात बनण्यासाठी आर्थिक ताकत महत्वाची आहे.)
-राजेंद्र (राजा ) गायकवाड
*या परत फिरा रे…की पुढे सरा रे..?*
राजे तुम्ही पुन्हा एकदा या. …बाबा तुम्हीच आम्हाला तारू शकता. …तुम्ही पुन्हा जन्माला या. ….
आम्ही कपाळ करंटे अन् नालायक आहोत. ..आम्हाला तुमचं मिशनच समजलं नाय….आणि नवीन काहीतरी म्हणाल तर आम्ही ठणठण गोपाळराव आहोत. …
आम्ही आजही सनातन्यांच्या उकिरड्या वर बसून शिळ्या अर्ध्या चतकोर भाकरीला करवंटीतल्या चहात बुडवून ढेकर देण्यात धन्यता मानतो. …स्वाभिमान तुमच्या कडे होता….आमच्या कडे औषधाला सुद्धा नाही. .
तुम्ही घडविलेल्या इतिहासाचे शिक्षण घेऊन आम्ही भुभूक्षित झालो. ..तुम्ही सुशिक्षित-सुसंकृत म्हणाला होता आम्ही अडाणी ठोकळे राहिलो. …तुम्ही परत एकदा जन्माला या. ..
तुमच्या वेळी परिस्थिती नुसार आंदोलने केली चळवळी उभारल्या तुम्ही त्या जिंकलात इतिहास घडविला. …आम्ही मात्र आम्हाला आज काय हवंय हेच न कळल्याने. …मागच हुंगत बसलोय. ..
फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांची पुरोगामी चळवळ आजही श्रेष्ठ आहे आणि भविष्यात सुद्धा श्रेष्ठ असेल. ….
ज्यांना ती समजली त्यांनी आत्मसात करून समाजाला काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे अशा पुरोगामी कार्यकर्त्यांची उमेद वाढविणे आज महत्वाचे नाही का. .?
-विक्रांत वालकर ®
अस्मिताचा हा ऐतिहासिक प्रयत्न आहे. …निर्विवाद