Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 522
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590

Deprecated: mb_convert_encoding(): Handling HTML entities via mbstring is deprecated; use htmlspecialchars, htmlentities, or mb_encode_numericentity/mb_decode_numericentity instead in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 800
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 553
Deprecated: http_build_query(): Passing null to parameter #2 ($numeric_prefix) of type string is deprecated in /home2/ambedflx/public_html/wp-content/plugins/social-share-with-floating-bar/social-share-with-floating-bar.php on line 590
जगात तथागताचा विज्ञानवादी बुद्ध धम्म अश्वगतीने वाढत असतांना भारतात मात्र सर्वधर्मसमभावाच्या राजकीय मोहजालात अडकतांना दिसत आहे.त्याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे.धम्म दीक्षा घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ६५ वर्ष पूर्ण होत असताना.त्यांनी दिलेले धम्म आज ही समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही.बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती,नवरात्र उत्सव काल पर्यंत साजरा होत होता.
आता अनेक उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सबल झालेले लोक उघडपणे मोठ्या उत्सवात गणपती व नवरात्र उत्सव साजरा करतांना दिसतात. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा लोक विसरून पुन्हा अस्पुष्य बनण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे ३३ कोटी देवांनी त्यांना कधीच वाचवले नव्हते, हे माहिती असून ही ते त्यांच्या मागे लागले.आणि भविष्यात ३३ कोटी देव देवी वाचवणार नाहीत अशी शंभर टक्के खात्री आम्हाला आहे.कारण आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्म घेणार नाहीत.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभाव च्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याच आव आणतात.त्यामुळे आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व आंबेडकरी चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही. याची खंत कुठे व्यक्त करावी.सर्वच एकमेकाकडे बोट दाखवतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी असंघटीत अशिक्षित पिढीत शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित पिढीत शोषित समाजाची काय अवस्था असेल.या चिंतेने ते सतत तळमळत होते.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्यासाठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.

इंग्लंड सारख्या परदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठेसाठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला.आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद,संघटना व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून नेहमीच वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही.कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.

आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती आमच्या प्रेरणास्थानाची धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या वापराची (व्यापराची) झाली आहे. वैचारिक किंवा स्वार्थीपणाचे मतभेद मिटायलाच तयार नाहीत.आदर्श कोणाकडून घ्यावा रिपब्लिकन विचारा पासून सर्वच वंचित बनायला तयार आहे. सम्राट अशोकाचा धम्म विजया दशमी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे.त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे पिढीत शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.मनुस्मुर्ती जाळली,महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.मी हिंदू म्हणून मारणार नाही.
आजच्या परिस्थिती सर्वच हिंदू कागदावर आहेतच पण घरात पण आचरण करण्यास लागले.सहन होत नाही.आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पिढीत शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविणार.आणि आज खरेच पिढीत शोषित समाजात जास्तीच बद्दल झाला.
त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभावाचा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाले.विविध पक्षात त्यांची ओळख कायम वेगळे कार्यकर्ते म्हणून असते.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.म्हणूनच सम्राट अशोकाचा धम्म विजया दशमी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे.याचा गांभियाने विचार झाला पाहिजे.
माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला. नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे सम्राट अशोकाच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्तरंजित सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १३ ऑक्टोबर १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये.तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे.
जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धम्म आहे.धर्म नाही. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता “सर्वधर्मसमभाव” ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत. मग सम्राट अशोकाचा धम्म विजया दशमी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ विजय दिन कोणता व कसा साजरा करतील?.
बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो.शिल, सदाचाराची शिकवण देतो.या धम्मात ईश्वराला,काल्पनिकतेला,कर्मकांड व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाजात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभावाच्या मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
१३ ऑक्टोबर १९३५ ला घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला पूर्ण करून दाखवली आपले काय ?.सम्राट अशोकाच्या विजय दिनाला आपण काय काय म्हणणार?.अश्विनी शुद्ध पौर्णिमेच्या दहाव्या (दिवशी दशमी) सम्राट अशोक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे लोखो अनुयायी यांनी आजवर जगातील अनेकांनी धम्मदीक्षा घेतली.एखाद्याने बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेणे हा बौद्ध धम्माचा विजय आहे.जगात विजय उत्सव कोणत्याच धर्माचा होत नाही.रक्तपात करून राजा अशोक सम्राट अशोक होतो.मनाला शांती लाभत नाही.म्हणून शस्त्र खाली ठेऊन बुद्धाला बुद्धाच्या धम्माला संघाला शरण जातो.त्यांचा तो सम्राट अशोकचा धम्म विजय दिवस उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. त्याचा अभ्यास न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ अश्व गतीने कुठे कोणत्या दिशेला चालली समजत नाही. यावर मनमोकळी चर्चा,संवाढ,झाला पाहिजे. मीच जास्त शहाणा थोर विचारवंत बाकी कोणी नाही. ही भावना प्रथम नष्ट झाली पाहिजे.विचारधारे नुसार आचरण दिसले पाहिजे.शील,संपन्न लोकांनी एकत्र बसून गांभियाने विचार केला पाहिजे.सम्राट अशोकाच्या धम्म विजय दिना निमित्याने सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक मंगल कामना.

-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.धम्म अभ्यासक व प्रचारक