धर्मसत्तेच्या आड लपलेला बलात्कारी आसाराम आयुष्यभर आता कारावासाच्या अंधारात…!
आसाराम…एक कार्पोरेट सन्यासाचे सर्वात उंच आणि प्रतिष्ठित नाव .जेव्हढ्या प्रमाणात या कापोरेट साधुची प्रसिध्दी झाली येव्हढी कुणाची झाली नसेल. तेव्हा झी सारखा प्राव्हेट चायनय आसारामला Live दाखवायचा,गरीब आणि भोळ्या भक्तांना फसविण्याचे तेव्हापासुनच सुरू झाले.नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साधना,संस्कार आदी सारख्या मंदबुध्दींची फोजतयार करणार्या या धर्मसत्तेच्या अखरित्यातिल असणार्या काळे पैसेवाल्यांच्या चॅनेलने तर त्याला उत्सवासारखा प्रचारित केला. भक्तानी आपल्या जमीनी,संपत्ती याच्या नावावर केल्या .संपत्ती धन दौलत हे समजु शकतो पण ज्या सन्यासाला सामान्य माणसे देवासारखी पुज्य मानतात त्याच सन्यासाने आपल्या सार्या नितीमत्तेची कापडे काढुन एका असाह्य मुलीला तीच्या भाबड्या भक्तीच्या मोबदल्यात बलात्कार करत असेल तर हा नराधम लोकांना सांगत असणार्या नितीमत्तेची कापडे टराटर फाटु लागतात.
शारिरीक बलात्कार तर केलाच पण उभ्या भारताच्या हजारो वर्षांच्या रुढीपरंतरा ,धर्मांधतेचा टेंभा मिरवणार्या संस्कृतीवरच बिनधास्त बलत्कार करत कित्येक वर्षे प्रतिष्ठेणे मिरवत होता.
भारतीय संविधानाचा अन प्रामाणिकपणे लढा देणार्या न्यायधिश,वकिलांनी ,पोलिस त्या तरूणी व तिच्या कुढुंबियांनी ह्या धेडांविरुध्द जे शस्र उगारले त्याचा विजय झाला. सत्य शेवटपर्यंत लढले तर जिंकते हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
जोधपुरच्या एस सी /एसटी न्यायालयात लढलेला हा लढा तमाम भारतीयाला गंभिर करणारा आहे. धर्म,जाती,साधु संत,पोथी पुराण,रूढी परंपरा यांच्या खौट्या मायाजाळात रमणारा हा भारतीय समाज कसा अनैतिक भोंदुबाबा यांच्या जाळ्यात फसत आहे.
समाजातील कित्येक लोक याची शिकार झाले असती त्या सर्व शोषीतांना किमान माणसिक समाधान मिळाले असेल,
या निकालाने हुरूळुन जाण्यात काय अर्थ नाही.आठ वर्ष असलेल्या आसिफाचे काय?
महाराष्टातल्या प्रियंका भोतमांगेचे काय? आदि कित्येक लेकी बाळीचे आयुष्य उध्दवस्त करणार्या नराधमांचे काय…?
या हजारो प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत
याचे काय…?
फेसबुक,व्हाटसअप वर होणारे मतांतर रस्त्यांवर अन संविधानिक पध्दतीन लढत नाहीत तोपर्यंत हे असेच कितेक आसाराम अधिकच वाढत राहतिल व भारतीय संस्कृती वर खुलेआम बलात्कार करत राहतील हे थांबवायला हवं.
—प्रमोद रामचंद्र जाधव